
मुंबई: सैराट चित्रपटामुळं त्यामध्ये काम करणाऱ्या कलाकारांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. आर्चीची भूमिका केलेल्या रिंकू राजगुरूला या चित्रपटामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर चाहते मिळाले. ती कायमच प्रेक्षकांच्यात चर्चेत राहत असते. कोल्हापूर येथील खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज यांच्यासोबत काढलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
एका मुलाखतीदरम्यान रिंकूला इंडस्ट्रीमध्ये कोणासोबत जवळीक झालेली का? असा प्रश्न विचारण्यात आलेला. त्यावर काय म्हणालेली रिंकू हे जाणून घेऊया. त्यावर बोलताना रिंकूने सांगितलं की, सगळ्याच लोकांनी खूप प्रेम दिलं. मी सगळ्यात लहान आहे, त्यामुळे ज्या सेटवर जायचे तिथे मीच लहान असायचे. त्यामुळे मला खूप काही शिकायला मिळायचे.
ती पुढे बोलताना म्हणते की, आताच मी एका चित्रपटात काम केलं असून त्याच नाव साडे माडे तीन आहे. या चित्रपटात भरत सरसुद्धा काम करत असून त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळालं. भरत सर मला वडिलसंसारखे आहेत. जे खूप चांगले सल्ले देतात आणि कधी काम बघितलं तर कौतुक सुद्धा करतात.
सिद्धार्थ जाधव बद्दल बोलताना रिंकू म्हणाली की, सेटवर सिद्धू आणि मला खरी बिस्कीट बोलायचे. नुकतंच आम्ही पहिल्यांदा रक्षाबंधन साजरं केलं. अशी खूप चांगली लोक आपल्याला भेटत असतात. जी आपल्याला आपल्या चुकीच्या आणि बरोबर गोष्टी सांगत असतात असं यावेळी बोलताना रिंकू राजगुरूने म्हटलं आहे.