Vicky Kaushal Katrina Kaif : मंगळवारी सकाळी विकी कौशल आणि कतरिना कैफ या जोडीने त्यांच्या गर्भधारणेची घोषणा केल्यापासून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
"आमच्या आयुष्यातील सर्वोत्तम अध्यायाची सुरुवात करण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत, आमची हृदये आनंद आणि कृतज्ञतेने भरलेली आहेत," असे विकी आणि कतरिनाने इंस्टाग्रामवर एका संयुक्त घोषणेत लिहिले.

त्या दोघांनी एक सुंदर फोटोही शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघेही पांढऱ्या रंगाच्या कपड्यांमध्ये दिसत असून, विकी प्रेमाने कतरिनाच्या बेबी बंपला धरून आहे.

विकी आणि कतरिनाने ही आनंदाची बातमी देताच, चित्रपट कलाकारांसह नेटकऱ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

या सर्व संदेशांमध्ये, अभिनेता अक्षय कुमारच्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने होणाऱ्या आई-वडिलांना त्यांच्या मुलाला इंग्रजी आणि पंजाबी दोन्ही भाषांमध्ये समान प्राविण्य मिळवून देण्याचा मजेशीर सल्ला दिला.

Ad3

"कतरिना आणि विकी, तुमच्यासाठी खूप आनंद झाला आहे. तुम्हाला ओळखून मी म्हणू शकतो की तुम्ही दोघे सर्वोत्तम पालक व्हाल. फक्त बाळाला इंग्रजी आणि पंजाबी समान शिकवा ;) खूप प्रेम आणि आशीर्वाद. जय महादेव," अशी कमेंट अक्षयने केली.

दीपिका पदुकोणने कमेंट सेक्शनमध्ये दृष्ट लागू नये यासाठी इमोजी टाकले.

"तुमचे दोघांचे अभिनंदन," अशी कमेंट अभिनेत्री क्रिती सॅननने केली.

असे पडले दोघे प्रेमात

विकी आणि कतरिनाने ९ डिसेंबर २०२१ रोजी राजस्थानमधील सिक्स सेन्सेस फोर्ट बरवारा येथे लग्न केले.

Ad4

'कॉफी विथ करण'मध्ये कतरिनाने खुलासा केला होता की, ती विकीला झोया अख्तरच्या पार्टीत भेटली होती आणि तेव्हापासून त्यांच्यात प्रेम फुलू लागले.

विकीसोबतच्या तिच्या नात्याबद्दल तपशील शेअर करताना, कतरिनाने सांगितले की विकी तिच्या 'रडार'वर कधीच नव्हता. ती म्हणाली, "मला त्याच्याबद्दल जास्त माहितीही नव्हती. मी फक्त त्याचे नाव ऐकले होते, पण कधीही त्याच्याशी जोडले गेले नव्हते. पण जेव्हा मी त्याला भेटले, तेव्हा मी जिंकले गेले!"