ती असंही सांगते की, "काही लोकांनी मला समजावण्याचा प्रयत्न केला की असं का करतेयस? पण मला वाटतं, मी नशीबवान आहे की मला काम मिळतंय. इंडस्ट्रीमध्ये अनेक मुली आहेत, ज्या मेहनत करताहेत, पण त्यांना संधीच मिळत नाही. काम मिळतंय, पोटापाण्याची चिंता नाही, हीसुद्धा एक मोठी गोष्ट आहे."
तन्वी पाटील तिच्या सामाजिक आयुष्याबद्दलही प्रांजळपणे बोलते. ती म्हणते, “जे माझ्या कामाबाबत किंवा भडक भूमिकांबाबत गैरसमज पसरवतात, गॉसिप करतात, त्यांच्यापासून लांब राहणंच योग्य आहे. असे लोक खरंतर मैत्री करण्याच्या लायकीचे नसतात. मी प्रसिद्ध आहे, मला काही फरक पडत नाही. लोकं बोलणारच, पण माझं काम माझ्यासाठी महत्त्वाचं आहे.”