मुंबई : अॅनिमेटेड असूनही आश्विन कुमार दिग्दर्शित ‘महावतार नरसिम्हा’ या पौराणिक अॅनिमेटेड चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर झंझावाती कामगिरी केली आहे. हा चित्रपट केवळ अॅनिमेशन चित्रपटांच्या लिमिटेशन्स मोडत नाहीये, तर प्रेक्षकांच्या अपेक्षाही पार करत आहे.
ट्रेड अॅनालिस्ट साकनिल्कच्या सुरुवातीच्या अंदाजानुसार, ‘महावतार नरसिम्हा’ने दुसऱ्या शनिवारी (३ ऑगस्ट २०२५) भारतात १५ कोटींचा गल्ला जमवला, ज्यामुळे एकूण कमाई ६७.९५ कोटींवर पोहोचली आहे. पहिल्या सात दिवसांतच या चित्रपटाने ४४.७५ कोटी रुपये मिळवले होते. दुसऱ्या शुक्रवारचा गल्ला ७.७ कोटी होता. चित्रपट आता लवकरच ७० कोटींचा टप्पा पार करणार आहे, ज्यामुळे तो भारतातील सर्वाधिक यशस्वी अॅनिमेटेड चित्रपटांपैकी एक ठरतोय.
‘महावतार नरसिम्हा’ हा जयपूर्वा दास आणि रुद्र प्रताप घोष यांनी सह-लेखित केला आहे. या चित्रपटातील दृश्य परिणाम, आध्यात्मिक आशय, आणि कथनशैली यांचं सोशल मीडियावर मोठं कौतुक होत आहे. पौराणिक कथा आणि अॅनिमेशन यांचं सुंदर मिश्रण प्रेक्षकांना खूप भावतंय.
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.