स्वरा भास्कर ट्रोल, एका वर्षात ओळखता येईना झाल्या

Published : Nov 18, 2024, 11:37 AM IST

स्वरा भास्कर यांचे पती फहाद यांनी मौलाना सज्जाद यांची भेट घेतल्यानंतर त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. चित्रपटांपेक्षा वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणाऱ्या स्वरा भास्कर पुन्हा एकदा ट्रोल झाल्या आहेत.

PREV
14

वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर पुन्हा एकदा चर्चेत आहेत. पती फहाद अहमद यांच्यासोबत मौलाना सज्जाद नोमानी यांची भेट घेतल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

24

स्वरा भास्कर यांचे पती फहाद अहमद हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे दोघांनी मौलाना सज्जाद नोमानी यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. 'हजरत मौलाना सज्जाद नोमानी साहिबांना भेटलो, त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिले.'

34

फहादसोबत उभ्या असलेल्या स्वरा भास्कर ट्रोल झाल्या आहेत. गुलाबी रंगाचा सलवार सूट परिधान करून डोक्यावर दुपट्टा घेतलेला फोटो ट्रोल झाला आहे. लग्नानंतर स्वरा भास्कर ओळखता येईनाशा झाल्या आहेत, असे नेटकरी म्हणत आहेत.

44

फेब्रुवारी २०२३ मध्ये स्वरा आणि फहाद यांचा विशेष विवाह कायद्याअंतर्गत विवाह झाला. त्याच वर्षी त्यांना रबिया नावाची मुलगी झाली.

Recommended Stories