१० हजार चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला कंगुवा
कंगुवा चित्रपट काल १० हजार चित्रपटगृहांमध्ये एकाच वेळी प्रदर्शित झाला. चित्रपटात सूर्या आणि दिशा पटानी मुख्य भूमिकेत आहेत, तर बॉबी देओल खलनायकाच्या भूमिकेत आहे. याशिवाय, नटराज सुब्रमण्यम, के.एस. रविकुमार, योगी बाबू, रेडिन किंग्स्ली, कोवई सरला आणि मनसूर अली खान यांच्याही भूमिका आहेत.