सोशल मीडिया स्टार आणि बिग बॉस विजेता सुरज चव्हाण लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. त्याची होणारी बायको संजना असून, ती त्याच्या चुलतमामाची मुलगी आहे. लग्नाच्या तयारीत त्याची मैत्रीण अंकिता वालावलकर मदत करत आहे.
सुरज चव्हाण हा सोशल मीडियावर कायमच चर्चेत असणारा चेहरा आहे. आता त्याच्या लग्नाच्या चर्चा सुरु झाल्या असून लवकरच तो सात जन्माच्या गाठी बांधणार आहे. आपण आता त्याच्या होणाऱ्या बायकोबद्दल माहिती जाणून घेऊयात.
27
अंकिताने शॉपिंगमध्ये सुरजची केली मदत
अंकिता वालावलकर हिने सुरजची शॉपिंगमध्ये मदत केल्याचं सांगितलं. कोकण हर्टेड गर्ल आणि सुरज या दोघांची चांगली बॉन्डिंग असल्याचं दिसून आलं आहे. यावेळी अंकिताने तिच्या घरी सूरजसाठी केळवण ठेवलं होतं.
37
सुरज २९ नोंव्हेंबरला करणार लग्न
सुरज हा २९ नोंव्हेंबरला लग्न करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. अंकिता आणि सुरज हे दोघे शॉपिंगला गेले होते. अंकिताच्या ड्रेस मॅचिंगनुसार सुरज खरेदी करत असल्याची माहिती समजली.
सुरजचं लग्न कसं जमलं हा अनेकांना प्रश्न पडला आहे. सुरजचं अरेंज मॅरेज नसून त्यांनी लव्ह मॅरेज केल्याची माहिती एका मुलाखतीत बोलताना त्यानं दिली. संजना ही सुरजच्या चुलतमामाची मुलगी असल्याची माहिती त्यांनी दिली.
57
अंकिताने सुरजच्या केळवणाची केली तयारी
अंकिताने सुरजच्या केळवणाची तयारी जोरदार केली होती. फुलांची सजावट तसेच सूरज आणि अंकिताला पुरी आणि भाजीचा बेत केल्याचं दिसून आल आहे. यानंतर या दोघांनाही तिने खास बेत केला होता.
67
सुरजने काय घेतला उखाणा?
सुरजने यावेळी बायको संजनासाठी उखाणा घेतला आहे. बिग बॉस जिंकून झालं माझं स्वप्न पूर्ण, संजनाचं नाव घेतो आता करेल लग्न असा उखाणा संजनाने घेतला आहे. यावेळी त्याच्या बायकोने उखाणा घेतला आहे.
77
संजनाने घेतला उखाणा
यावेळी बायको संजनाने उखाणा घेतला आहे. तिने उखाणा घेताना म्हटलं की, बिग बॉसचा विनर माझ्या प्रेमात झाला सायको, सुरज रावांचं नाव घेते मीच त्यांची होणारी बायको. उखाण्यानंतर संजना रुजलेली दिसून आली.