श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव स्टारर Stree-2 सिनेमासाठी अ‍ॅडवान्स बुकिंग सुरू

Published : Aug 10, 2024, 01:35 PM IST
Stree 2

सार

Stree-2 Advance Booking : श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावचा आगामी सिनेमा स्री-2 ची प्रेक्षकांकडून वाट पाहिली जात आहे. अशातच सिनेमाचे अ‍ॅडवान्स बुकिंग सुरू झाले आहे. याशिवाय सिनेमाच्या रिलीजसंदर्भात एक सरप्राइजही प्रेक्षकांना मिळणार आहे.

Stree-2 Advance Booking : यंदाच्या वर्षातील बहुतप्रतीक्षित सिनेमा स्री-2 लवकरच सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. श्रद्धा कपूरचा हॉरर कॉमेडी सिनेमा पाहण्याची प्रेक्षकांकडून आवर्जुन वाट पाहिली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून स्री-2 सिनेमाचे जोरदार प्रमोशन केले जात आहे. अशातच सिनेमाचे अ‍ॅडवान्स बुकिंग सुरू झाले आहे.

स्री-2 सिनेमाचे अ‍ॅडवान्स बुकिंग
अमर कौशिक यांनी दिग्दर्शित केलेल्या स्री-2 सिनेमा प्रक्षेकांना घाबरवणारही आहे आणि हसवणारा देखील आहे. श्रद्धा कपूरच्या स्री सिनेमातील भूमिकेला प्रेक्षकांनी पसंत केले होते. यंदाच्या सिनेमातील कथेत ट्विस्ट टाकत निर्मात्यांनी मानकाप्याची दहशत दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. अशातच स्री-2 सिनेमा पाहण्यास उत्सुक असाल तर त्याचे अ‍ॅडवान्स बुकिंग सुरू झाले आहे. याशिवाय निर्मात्यांनी प्रेक्षकांना एक खास सरप्राइजही दिले आहे.

स्री सिनेमाचा सिक्वल करणार बॉक्स ऑफिसवर धमाका
स्री सिनेमा 31 ऑगस्ट 2018 मध्ये रिलीज झाला होता. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. याच्या 6 वर्षानंतर स्री सिनेमाचा सिक्वल प्रदर्शित केला जाणार आहे. सिनेमात वरुण धवन आणि तमन्ना भाटिया यांचा कॅमियो असणार आहे. याशिवाय पंकज त्रिपाठी आणि अभिषेक बनर्जी आपल्या जुन्या अंदाजात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास तयार आहेत.

या दिवशी पाहता येईल पहिला शो
बुक माय शो वर सिनेमाचे अ‍ॅडवान्स बुकिंग सुरू झाले आहे. सिनेमा 15 ऑगस्टला रिलीज होणार आहे. पण एक ट्विस्ट आहे. स्री-2 सिनेमाचा नाइट शो 14 ऑगस्टला रात्री 9 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार आहे.

आणखी वाचा : 

अमृता फडणवीस यांचे नवे गाणे 'Saawan' प्रदर्शित, पाहा VIDEO

अभिषेक बच्चन-ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटासाठी एक डॉक्टर ठरलाय कारण?

PREV

Recommended Stories

कार्तिक आर्यनने या व्यक्तीच्या लग्नातील फोटो शेअर करत लिहिली भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यातून येईल पाणी
7.45 लाख कोटींचा करार, Netflix ने हॉलीवूडच्या Warner Bros चे साम्राज्यच घेतले ताब्यात..!