Sugandha Mishra Baby Shower : नवखी चाहुल,इवलं पाऊल! सुगंधा मिश्राचा मराठमोळ्या स्टाइलने पार पडला डोहाळे जेवणाचा कार्यक्रम
Sugandha Mishra Baby Shower : स्टँडअप कॉमेडियन कपल सुगंधा मिश्रा आणि डॉ. संकेत भोसले यांच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे.
Harshada Shirsekar | Published : Oct 30, 2023 1:42 PM / Updated: Nov 07 2023, 10:42 AM IST
कुणी येणार गं!
स्टँडअप-कॉमेडियन सुगंधा मिश्रा आणि डॉ. संकेत भोसले यांच्या घरी लवकरच नवीन पाहुण्याचे आगमन होणार आहे. सुगंधा आणि संकेत पहिल्यांदाच आई-बाबा होणार आहेत.
चाहत्यांसोबत शेअर केले फोटो
नुकतेच सुगंधाचा मराठमोळ्या पद्धतीने डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. या जोडप्याने डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर शेअर देखील केले आहेत
डोहाळे पुरावा हीचे डोहाळे पुरावा!
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमासाठी या जोडप्याने पारंपरिक पोशाख परिधान करून बर्फी की पेढ्याचे खेळ, ओटीभरण यासारख्या महाराष्ट्रीयन परंपरा पूर्ण करत धनुष्यबाणासह फोटोशूट देखील केले.
पारंपरिक लुक
सुगंधाने कार्यक्रमासाठी केशरी-हिरव्या रंगाची सुंदर साडी नेसली होती. तर संकेतनंही कुर्ता पायजमा व सुगंधाच्या साडीशी मॅचिंग केशरी रंगाचे नेहरू जॅकेट परिधान केले होते. सुगंधाने फुलांचे दागिने व सौम्य स्वरुपातील मेकअप लुक कॅरी केला होता.
आई-बाबांमध्ये रंगली स्पर्धा
यावेळेस सुगंधा-संकेतसाठी काही स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते. बाहुल्यांना डायपर घालण्याच्या स्पर्धेचे फोटोही सुगंधाने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
चाहत्यांसोबत शेअर केली गोड बातमी
वर्ष 2021 मध्ये 28 एप्रिलला सुगंधा मिश्रा व संकेत भोसले विवाहबंधनात अडकले होते. दोन वर्षांनंतर या जोडप्याने आई-बाबा होणार असल्याची गोड बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली.
नव्या पाहुण्याचे आगमन
घरामध्ये नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याची आनंदाची बातमी या कपलने 15 ऑक्टोबरला (2023) आपल्या चाहत्यांना दिली.
सुगंधा व संकेतनं आपल्या होणाऱ्या बाळासाठी एक खास गाणे देखील तयार केले होते. हे गाणे खुद्द सुगंधा लिहिले तसेच संगीतबद्धही केले होते. लवकरच याचा व्हिडीओ शेअर करणार असल्याचीही माहिती तिने सोशल मीडियाद्वारे दिली आहे.