Published : Jul 22, 2025, 12:58 PM ISTUpdated : Jul 22, 2025, 01:02 PM IST
मुंबई - एखाद्याची दुःखद कहाणी समोर आली की सोनू सूद लगेच मदतीला धावतो. हिंदीसह अनेक भाषांमध्ये खलनायक, सहाय्यक भूमिकांमध्ये त्याने काम केले आहे. त्याच्या आलिशान जीवनशैलीची आणि संपत्तीची माहिती जाणून घ्या.
बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याने कोरोना काळात अनेकांना मोठी मदत केली. यावेळी इतर शहरांमध्ये अडकलेल्या मजुरांना घरी पाठविण्यात मोलाची भूमिका बजावली. केवळ एवढेच नव्हे तर त्यांच्या रोजच्या खाण्यापिण्याचीही खर्च केला. तेव्हापासून सोनू सूदचे सामाजिक आयुष्य प्रकाशझोतात आले आहे…. पुढे वाचा फराह खानच्या शोमध्ये सोनू सूद
29
फराह खानच्या शोमध्ये सोनू सूद
फराह खानच्या शोमध्ये सोनू सूदच्या गंगोत्री या बंगल्याची माहिती देण्यात आली आहे. मुंबईत हा आलिशान बंगला असून सोसू सूद येथे कुटुंबासह राहतो. या बंगल्याची झलक या शोच्या माध्यमातून लोकांना मिळाली… पुढे वाचा सोनू सूदचा २० कोटींचा बंगला
39
सोनू सूदचा २० कोटींचा बंगला
सोनू सूदचा बंगला २० कोटींचा असल्याचे सांगितले जाते. परंतु, या बंगल्याची किंमत या पेक्षा जास्त आहे, असे जाणार सांगतात. हा बंगला अतिशय आलिशान असून अगदी एखाद्या राजमहालात आल्यासारखे वाटते. शुटींगला गेला नसेल तर सोनू सूद याच बंगल्यात राहतो. .. पुढे वाचा सोनू सूदची आलिशान बेडरुम
या बंगल्यात सोनू सूदची आलिशान बेडरुम आहे. तसेच या खोलीत एका आरामदायी खुर्चीही आहे. त्यावर बसूनही आराम करता येतो. खोलीच्या बाहेर एका सोफासेट ठेवला असून काचेतूनही कोण पाहुणे आले आहेत ते दिसते. बेडच्या मागे भिंतीवर आतिशय आकर्षक डिझाईन केले आहे… पुढे वाचा सोनू सूदचे शुज कलेक्शन
59
सोनू सूदचे शूज कलेक्शन
सोनू सूदला शुज खुप आवडतात. त्याने वेगवेगळ्या शुजचे कलेक्शन केले असून त्याची एक अलमारीच ठेवली आहे. त्याला ज्या दिवशी जो शुज घ्यालायचा असतो तो या अलमारीत ठेवतो. अनेकदा तो कपड्यांवर मॅचिंग किंवा ऑबस्ट्रॅक्ट शूज घालतो….पुढे वाचा छोटेखानी गार्डन
69
छोटेखानी गार्डन
या बंगल्याच्या आवारात एक छोटेखानी गार्डन बनवले आहे. त्यात खुर्ची टाकून निवांत बसता येते. येथे एक बुद्धाचा पुतळाही आहे. जो गार्डनची शोभा वाढवतो. वेगवेगळ्या प्रकारचे प्लॉंट या गार्डनमध्ये दिसून येतात…. पुढे वाचा पोर्चखाली सोफासेट
79
पोर्चखाली सोफासेट
दररोज सोनू सूद याला भेटायला अनेक लोक येतात. काही चित्रपटांच्या ऑफर्स घेऊनही येतात. त्यांना बसण्यासाठी पोर्चखाली एक सोफा ठेवला आहे. येथे ते वाट बघू शकतात. त्यानंतर त्यांना एकेक करुन आत बोलविले जाते…. पुढे वाचा उतरता जिना
89
घरात उतरता जिना
सोनू सूदच्या घरात एक उतरता जिना आहे. तो अतिशय आकर्षक दिसतो. अगदी चित्रपटातील जिन्याप्रमाणे त्याला लुक आहे. हा जिना अनेकांचे लक्ष वेधून घेतो. ग्राऊंड फ्लोअर आणि पहिला मजला याला जोडण्याचे काम हा जिना करतो… पुढे वाचा सोनूची १४० कोटींची संपत्ती
99
सोनू सूदची १४० कोटींची संपत्ती
सोनू सूदकडे सुमारे १४० कोटींची संपत्ती असल्याचे सांगितले जाते. पण प्रत्यक्षात त्याची संपत्ती यापेक्षा जास्त असल्याचे समजते. सध्या तो वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये काम करत असून दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही त्याला ऑफर्स येत आहेत.