Shrikant Box Office Collection : राजकुमार रावच्या 'श्रीकांत' सिनेमाची प्रत्येक दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई, तिसऱ्या दिवशी कमावले इतके रुपये

Shirkant Movie Box Office Collection :  बॉलिवूडमधील अभिनेता राजकुमार रावचा सिनेमा श्रीकांतने दुसऱ्या दिवशी ओपनिंग डे पेक्षा दुप्पट कमाई बॉक्स ऑफिसवर केली. अशातच तिसऱ्या दिवशीही सिनेमाने आधीपेक्षा रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे.

Srikanth Box Office Collection Day 3 : व्यायसायिक श्रीकांत बोल्ला (Srikanth Bolla) यांचा बायोपिक 'श्रीकांत' सिनेमा 10 मे ला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. सुरुवातीच्या दोन दिवसांचे बॉक्स ऑफिसवरील कलेक्शन पाहता सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस पडत नसल्याचा अंदाज लावण्यात आला. सिनेमाला समीक्षकांकडून उत्तम रिव्हूजही मिळाले होते. अशातच दुसऱ्या दिवसापेक्षा तिसऱ्या दिवशी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे.

सिनेमाचे आतापर्यंतचे कलेक्शन
सॅकनिल्कच्यानुसार, सिनेमाचे पहिल्या दिवशी कलेक्शन 2.25 कोटी रुपये होते. दुसऱ्या दिवशी सिनेमाच्या बॉक्स ऑफिसवरील कमाईत वाढ झाली. पहिल्या दिवसापेक्षा जवळजवळ 87 टक्के अधिक कमाई करण्यात आली. याशिवाय सिनेमाने दुसऱ्या दिवशी 4.2 कोटी रुपये कमावले.

आता तिसऱ्या दिवशी सिनेमाने 5.50 कोटी रुपये कमावले आहेत. अशातच सिनेमाचे बॉक्स ऑफिसवरील एकूण कलेक्शन 11.95 कोटी रुपये झाले आहे. दरम्यान, कलेक्शनची आकडेवारी अधिकृत नाही. यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

सिनेमाला विकेंडचा फायदा
सिनेमाचा ट्रेलर पाहून अंदाजा लावला जात होता की, राजकुमारचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार. सिनेमाची प्रत्येक दिवसाची कमाई सातत्याने वाढत चालली आहे. याशिवाय सिनेमाला विकेंडचाही फायदा झाला. दुसऱ्या दिवसापेक्षा तिसऱ्या दिवशी श्रीकांत सिनेमाने अधिक कमाई केली.

श्रीकांत सिनेमाची कथा
श्रीकांत सिनेमा आंध्र प्रदेशातील गावात राहणाऱ्या एका नेत्रहीन व्यक्तीची आहे. बालपणीच आई-वडिलांना अनेकांनी सल्ल दिला होता मुलाचे तोंड दाबून ठार करा. पण आई-वडिलांनी मुलाची साथ कधीच सोडली नाही. सिनेमाची एकूणच कथा नेत्रहीन मुलाच्या आयुष्यातील संघर्ष ते यशाच्या शिखरावर पोहोचण्यापर्यंतच्या प्रवासाचे दर्शन घडवते.

श्रीकांत सिनेमातील स्टारकास्ट
सिनेमाचे दिग्दर्शन तुषार हीरानंदानी यांनी केले असून टी-सीरिजच्या बॅनर अंतर्गत तयार करण्यात आला आहे. सिनेमा बोलेंट इंडस्ट्रीचे प्रमुख श्रीकांत बोल्ला यांच्या आयुष्यावर आधारित आहे. श्रीकांत सिनेमात राजकुमार राव मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय अलाया एफ, ज्योतिका आणि शरद केळकरही सिनेमात दिसून येत आहे.

आणखी वाचा : 

यामुळे आंध्रप्रदेश पोलिसांनी दाखल केला अल्लू अर्जुनवर गुन्हा !

तृतीयपंथी असल्याने मराठी अभिनेत्रीचे हॉटेलचे बुकिंग केले रद्द, कारण ऐकून व्हाल हैराण

Share this article