Shahid Kapoor : शाहिद आणि मीरा कपूरने खरेदी केले तब्बल इतक्या कोटीचे अपार्टमेंट, किंमत ऐकून बसेल धक्का

Published : May 28, 2024, 12:27 PM IST
Shahid Kapoor Buy New Home

सार

शाहिद कपूरबाबत एक बातमी समोर येत आहे, त्याने मुंबईत आणखी एक घर विकत घेतले आहे. मुंबईतील वरळी भागात त्यांचे नवीन अपार्टमेंट असून त्याची किंमत अंदाजे 59 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. हे अपार्टमेंट 5614 चौरस फूट पसरलेले आहे. 

एंटरटेनमेंट डेस्क : शाहिद कपूरबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहिदने मुंबईत स्वत:साठी आणखी एक घर खरेदी केले आहे. शाहीदने वरळीच्या ओबेरॉय 360 वेस्टमध्ये 5614 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेले एक नवीन अपार्टमेंट 58.66 कोटी रुपयाला खरेदी केले आहे. कपूर यांनी पत्नी मीरा शाहिद कपूर यांच्यासोबत चांडक रियल्टी प्रायव्हेट लिमिटेडकडून हे अपार्टमेंट संयुक्तपणे खरेदी केले आहे.रिअल इस्टेट सल्लागार फर्म IndexTap.com च्या माहितीनुसार, शाहिदचे नवीन अपार्टमेंट ओबेरॉय 360 वेस्टच्या टॉवर बी मध्ये 24 व्या मजल्यावर आहे. त्यासाठी त्यांनी 1.75 कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरले आहे.

शाहिद कपूरने अपार्टमेंटसोबतच कार पार्किंगची जागा खरेदी केली :

शाहिद कपूरचा हा अपार्टमेंट डॉ. एनी बेझंट रोडवर आहे. या अपार्टमेंटसोबतच त्यांनी 3 कार पार्किंगसाठी जागाही खरेदी केली आहे. शाहिदने 2 वर्षांपूर्वी जुहूमध्ये एक आलिशान घर खरेदी केले होते. ज्याची किंमत सुमारे 56 कोटी रुपये आहे.सध्या ते या घरात कुटुंबासह राहतात. या घराचे इंटीरियर डिझाइन त्यांची पत्नी मीरा राजपूत यांनी केले आहे. मीरा अनेकदा तिच्या घरातील फोटो शेअर करत असते. आता शाहिद त्याच्या नवीन अपार्टमेंटमध्ये कधी शिफ्ट होणार याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

शाहिद कपूरचा वर्क फ्रंट :

शाहिद कपूरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तो या वर्षीच्या तेरी बातों में ऐसा उल्झा जिया या चित्रपटात शेवटचा दिसला होता. क्रिती सेनॉनसोबतचा हा चित्रपट प्रेक्षकांना आवडला आणि चित्रपटाने चांगली कमाईही केली. शाहिदच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर तो देवा या चित्रपटात दिसणार आहे.या चित्रपटात त्याच्यासोबत पूजा हेगडे मुख्य भूमिकेत आहे. या ॲक्शन थ्रिलर चित्रपटाचे शूटिंग सध्या सुरू आहे. हा चित्रपट 11 ऑक्टोबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय तो अश्वत्थामा या चित्रपटातही दिसणार आहे. वाशू भगनानी या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांवर बनणाऱ्या चित्रपटात शाहिद कपूरलाही साईन केल्याची बातमी आहे.

आणखी वाचा :

Randeep Hooda: सावरकरांच्या 141 व्या जयंतीनिमित्त रणदीप हुडाने दिली सेल्युलर जेलला भेट

अवघ्या 72 तासात दीपिका पादुकोणच्या मॅटरनिटी Yellow गाउनचा लिलाव, किंमत ऐकून चक्रावाल

PREV

Recommended Stories

कार्तिक आर्यनने या व्यक्तीच्या लग्नातील फोटो शेअर करत लिहिली भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यातून येईल पाणी
7.45 लाख कोटींचा करार, Netflix ने हॉलीवूडच्या Warner Bros चे साम्राज्यच घेतले ताब्यात..!