अंगाला भस्म आणि डोळ्यात रागाचा अंगार असलेला 'हा' मराठी अभिनेता कोण, पाहून ठोकाल मुजरा

Published : Oct 05, 2025, 08:47 AM IST

महेश मांजरेकर: प्रसिद्ध अभिनेते महेश मांजरेकर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या चित्रपटात पहिल्यांदाच साधूच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांचा हा नवा गूढ आणि करारी अवतार 'दुर्गे दुर्गट भारी' या गाण्यातून समोर आला आहे.

PREV
16
अंगाला भस्म आणि डोळ्यात रागाचा अंगार असलेला 'हा' मराठी अभिनेता कोण, पाहून ठोकाल मुजरा

आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारायला मिळणं म्हणजे कलाकारासाठी भाग्याचं असतं. ती संधी एखाद्या कलाकाराला मिळाली की तो संधीचे सोने करतो. मेकअप केल्यानंतर त्याच्या मागे कोणाचा चेहरा आहे हे लक्षात येत नाही, असाच एक कलाकार दुर्गे दुर्गट भारी या गाण्यामध्ये दिसून आला आहे.

26
कोण आहे तो कलाकार?

तो कलाकार दुसरा तिसरा कोण नसून प्रसिद्ध अभिनेते महेश मांजरेकर हे आहेत. 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या चित्रपटाचा टिझर आला असून तो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे. त्यामधील महेश मांजरेकर यांचा लूक सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. 

36
पहिल्यांदाच साधूच्या भूमिकेत

पहिल्यांदाच साधूच्या भूमिकेत महेश मांजरेकर यांनी या चित्रपटात भूमिका केली आहे. त्यांच्या या नवीन अवताराकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहील आहे. या गाण्यामध्ये महेश यांचा साधू रूपातील वेष अतिशय वेगळा दिसत आहे.

46
महेश मांजरेकर यांनी कसा लूक केला?

डोक्यावर भगवा कपडा, गळाभोवती रुद्राक्षांच्या माळा, विस्कटलेले केस, लांब दाढी आणि हातात शंख, या सर्वांमुळे त्यांची व्यक्तिरेखा प्रचंड उठून दिसते. त्यांच्या चेहऱ्यावरील तीव्रता, डोळ्यातील चमक आणि व्यक्त होणारा करारी भाव पाहून प्रेक्षकांची उत्सुकता आणखी चाळवली आहे.

56
आपल्या लुकबद्दल मांजरेकर काय म्हणाले?

आपल्या लुकबद्दल बोलताना महेश मांजरेकर यांनी म्हटलं की, आजवर मी विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. पण साधूच्या व्यक्तिरेखेत मी याआधी काम केलं नाही. हा लूक माझ्या नेहमीच्या लुकपेक्षा पूर्ण वेगळा असून यातली गूढता, ताकद आणि अध्यात्मिक छटा पूर्ण वेगळ्या आहेत.

66
या भन्नाट लूकमुळे चित्रपट आला चर्चेत

या भन्नाट लूकमुळे चित्रपट परत एकदा चर्चेत आला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधीच त्याची प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरु झाली. ३१ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित केला जाणार असून प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे.

Read more Photos on

Recommended Stories