बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध अभिनेत्याची झाली १२ लाखांची फसवणूक, ड्रायव्हर पेट्रोल पंपावर जायचा आणि...

Published : Oct 05, 2025, 07:58 AM IST

अभिनेता फरहान अख्तरच्या आईसोबत पेट्रोल पंपावर क्रेडिट कार्डद्वारे फसवणूक झाली आहे. त्यांचा ड्रायव्हर पेट्रोल न भरता पंपावरील कर्मचाऱ्याच्या मदतीने कार्ड स्वाईप करून पैसे काढत असे. या प्रकारच्या फसवणुकीपासून कसे वाचावे, याची माहिती या लेखात दिली आहे.

PREV
16
बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध अभिनेत्याची १२ लाखांची फसवणूक, ड्रायव्हर पेट्रोल पंपावर जायचा आणि...

आपण पेट्रोल कार्ड भरताना अनेक वेळा क्रेडिट कार्डचा उपयोग करत असतो. पण या कार्डचा वापर करताना आपली फसवणूक होण्याची शक्यता असते, अशीच एक घटना अभिनेता फरहान अख्तरसोबत घडली आहे. हि घटना वाचून तुमच्या डोळ्याचे झापड नक्कीच उघडतील.

26
ड्रायव्हर करत होता क्रेडिट कार्डचा करत होता वापर

फरहान अख्तरची आई हनी इराणी यांचा ड्रायव्हर कोणतीही माहिती न देता क्रेडिट कार्डचा वापर करत होता. तो फरहानच्या आईला पेट्रोल पंपावर घेऊन तर जायचा, कार्ड स्वाईप तर करायचा पण पेट्रोल भरत नसायचा.

36
पोलिसांनी सांगितली धक्कादायक माहिती

पोलिसांनी याबाबत धक्कादायक माहिती सांगितली आहे. त्यांनी सांगताना म्हटलं की, ३५ लिटर पेट्रोल क्षमतेच्या कारमध्ये ६२ लिटर पेट्रोल-डिझेल भरल्याचे बिल दाखवले जायचे. ड्रायव्हरने सांगितले की, फरहानच्या कार्डवरून हा गैरव्यवहार करण्यात आला.

46
पेट्रोल पंप कर्मचाऱ्याकडून कॅश घेऊन त्याला कमिशन द्यायचा

हा ड्रायव्हर पेट्रोल पंपावर गेल्यानंतर पेट्रोल टाकत नव्हता पण कॅश रक्कम मात्र तिथल्या कर्मचाऱ्याकडून घ्यायचा. त्यानंतर तो काही कमिशनचा भाग त्याला देत असायचा. रोज ही रक्कम १००० ते १५०० असायची.

56
वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

फरहानच्या आईचा ड्रायव्हर नरेश सिंह आणि पेट्रोल पंप कर्मचाऱ्याच्या विरोधात वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. वांद्रे पोलिस ठाण्यात या प्रकरणात हनी इराणी यांची मॅनेजर दीया भाटिया यांनी १ ऑक्टोबर रोजी तक्रार दाखल केली आहे.

66
तुम्ही यापासून कसे वाचू शकता?

तुम्ही यापासून स्वतःचा बचाव करू शकता. तुम्ही उंची ड्रायव्हरला एकट्याने न पाठवता त्याच्यासोबत जाऊ शकता. ड्रायव्हर एकटा पेट्रोल भरायला जात असेल तर त्याच्याकडे बिल मागा. आपले बँक स्टेटमेंट वेळोवेळी चेक करत राहा.

Read more Photos on

Recommended Stories