सामंथा रुथ प्रभूचा Unseen व्हिडीओ व्हायरल, पाहून व्हाल हैराण (Watch Video)

Published : Nov 18, 2024, 09:27 AM IST
Samantha Ruth Prabhu

सार

Samantha Ruth Prabhu Unseen Video : साउथ सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये सामंथाचा कधी न पाहिलेला लूक पाहून नक्कीच तुम्ही देखील हैराण व्हाल.

Samantha Ruth Prabhu Unseen Video Viral : सिनेसृष्टीतील कलाकार आपल्या लूकमध्ये बदल करण्यासाठी काही प्रकारच्या सर्जरी करतात. पण काहीवेळेस कलाकारांचे जुन्या लूकचे व्हिडीओ पाहून त्यांच्या नव्या लूकवर विश्वास ठेवणेही कठीण जाते. अशातच साउथ सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सामंथाचा लूक पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. याशिवाय काही युजर्सने व्हिडीओखाली वेगवेगळ्या कमेंट्सही केल्या आहेत.

सामंथाचा लूक पाहून नेटकरी हैराण
सामंथा रुथ प्रभूचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामधील सामंथाचा लूक पाहून सर्वांनाच झटका बसला आहे. या व्हिडीओमध्ये सामंथा एका ब्रँडचे प्रमोशन करताना दिसून येत आहे. यावेळी सामंथाने गुलाबी आणि पिवळ्या रंगातील सूट परिधान केला आहे. जाहिरातीलमधील सामंथाचा तारुण्यातील लूक पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. आधीचा आणि आताचा सामंथाचा लूक यामध्ये फार बदल झालेला पाहून नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत.

सामंथाचा लूक पाहून नेटकरी म्हणतात…
एका युजरने सामंथाच्या व्हिडीओखाली कमेंट करत म्हटले की, एवढी भयंकर सर्जरी, दुसऱ्याने म्हटले, प्लास्टिक सर्जरी नसेल तर या लोकांचे काय होईल? तिसरा म्हणतो की, हा व्हिडीओ पाहून विश्वास बसत नाहीये ही सामंथाच आहे. अशाप्रकारच्या वेगवेगळ्या कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओवर केल्या आहेत.

सिटाडेल : हनी बनीमुळे सामंथा चर्चेत
सामंथा रुथ प्रभू सध्या आपली बेव सीरिज 'सिटाडेल : हनी बनी'मुळे चर्चेत आहे. अ‍ॅक्शन-थ्रीलर असणाऱ्या या सीरिजमध्ये सामंथा रुथ प्रभू वरुण धवनसोबत मुख्य भूमिकेत झळकली आहे. याआधी सामंथाने अभिनेता मनोज वायपेयीसोबत 'द फॅमिली-2' मध्ये काम केले होते.

आणखी वाचा : 

जॅकी श्रॉफ यांनी नशेत तब्बूला किस करण्याचा प्रयत्न केला होता?

८२ वर्षीय अमिताभ बच्चन यांची अद्भुत ऊर्जा!

PREV

Recommended Stories

अक्षय खन्नाचा बॉक्स ऑफिसवरचा जलवा! करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारे 'हे' ५ चित्रपट कोणते? पाहा यादी!
Dhurandhar Banned : 300 कोटी कमावणारा धुरंधर पाकिस्तानमध्ये नव्हे तर या 6 देशांमध्ये का झाला बॅन?