दाक्षिणात्य सिनेमातील अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूचे वडील जोसेफ प्रभू यांचे निधन झाले आहे. जोसेफ प्रभू 67 वर्षांचे होते.
Samantha Ruth Prabhu Father Passed Away : साउथ इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूचे वडील जोसेफ प्रभू यांचे निधन झाले आहे. याबद्दलची माहिती खुद्द सामंथाने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून दिली आहे. जोसेफ प्रभू यांच्या निधनाचे कारण अद्याप समोर आलेले नाही. सामंथा अलीकडेच आपली वेब सीरिज 'सिटाडेल हनी बन्नी'च्या सक्सेस पार्टीत दिसली होती. आता अचनाक सामंथाच्या वडिलांचे निधन झाल्याने चाहत्यांनाही धक्का बसला आहे.
सामंथा रुथ प्रभूने आपल्या इंस्टाग्रामवरील स्टोरीत ब्रोकन हार्टचा इमोजी शेअर केला आहे. याशिवाय आपण पुन्हा भेटू असेही लिहिले आहे. सामंथाची वडिलांसाठीची भाऊक पोस्ट पाहिल्यानंतर सर्व चाहत्यांना धक्का बसला आहे. चाहत्यांकडून सामंथाला धीर देण्याचा प्रयत्न केला जात आहे.