
मुंबई : बॉलिवूडमधील दबंग म्हणजेच सलमान खानने अलीकडेच त्याचे मुंबईतील वांद्रे स्थित आपले आलिशान घर विकले आहे. रियल इस्टेट प्लॅटफॉर्म स्क्वेअर यार्ड्स (Square Yards) यांच्या मते, ही डील जुलै 2025 मध्ये झाली आहे. या डीलनुसार, सलमान खानने आपले हे अपार्टमेंट तब्बल 5.35 कोटी रुपयांना विकले आहे. ही माहिती महाराष्ट्रातील इंस्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन (IGR)च्या वेबसाइटवर दाखल करण्यात आलेल्या रजिस्ट्रेशन कागदपत्रांच्या आधारे समोर आली आहे. हीच माहिती स्क्वेअर यार्ड्स यांनी शोधून काढली.
सलमानचे आलिशान घर
सलमानचा आलिशान फ्लॅट मुंबईतील वांद्रे येथील शिव अस्तान हाइट्समध्ये आहे. या अपार्टमेंटचा बिल्ट अप एरिया 122.45 स्क्वेअर मीटर म्हणजेच 1318 स्क्वेअर फूट आहे. खास गोष्ट अशी की, या डीलसोबत तीन कार पार्किंग स्लॉट्सही देण्यात आले आहेत.
या ट्रांजेक्शनसाठी एकूण 32.01 लाख रुपयांची स्टँम्प ड्युटी आणि 30 हजार रुपयांची रजिस्ट्रेशन फी देण्यात आली आहे. यावरुन अंदाज लावू शकतो की, ही एक मोठी डील असू शकते.
वांद्रे पश्चिम का खास?
वांद्रे पश्चिम मुंबईतील सर्वाधिक प्रतिष्ठित आणि महागडी रहिवासी परिसरापैकी एक आहे. येथे मोठ्या संख्येने बॉलिवूड कलाकार, व्यावसायिक आणि हाय-प्रोफाइल पर्सनालिटीची लोक राहतात. या परिसराची खासियत अशी की, येथे काही प्रीमियम अपार्टमेंट, हेरिटेज बंगले आणि बुटीक कर्मशियलसाठी जागा उपलब्ध आहे.
याशिवाय वांद्र्याहून वेस्टर्न एक्सप्रेस हायवेची कनेक्टिव्हिटी आहे. वांद्रे हे ठिकाण रेल्वे स्थान आणि आगामी मेट्रो नेटवर्कला जोडले जाणारे आहे. तसेच वांद्रा-कुर्ला संकुल, लोअर परेल आणि मुंबई विमानतळ अशी महत्वाची ठिकाणी देखील येथून जवळ आहेत.
सलमानच्या कामाबद्दल
सलमान खानच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तो, 'टायगर -3' सिनेमानंतर यंदाच्या वर्षी 'सिकंदर' मधून झळकला होता. दरम्यान, सलमानच्या सिकंदर सिनेमाने अन्य सिनेमांच्या तुलनेत अधिक खास कमाई केली नाही. पण सलमान लवकरच एका नव्या सिनेमामध्ये झळकणार आहे. 'बॅटल ऑफ गलवान' असे सिनेमाचे नाव असून यामध्ये सलमान सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन अपूर्व लाखिया करत आहेत.