
कियारा आडवाणी-सिद्धार्थ मल्होत्राच्या घरी आली लेक: सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणी यांच्यासाठी मंगळवारचा दिवस आनंदाचा ठरला. दोघेही एका गोंडस बाळाचे पालक झाले. बाळाच्या जन्माची बातमी समोर येताच चाहते दोघांनाही सतत शुभेच्छा देत आहेत. दरम्यान, करन जोहरच्या स्टुडंट्सची बेबी गर्ल गँग आता पूर्ण झाली आहे. म्हणजेच करनच्या 'स्टुडंट ऑफ द इयर' चित्रपटातून आलिया भट्ट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी पदार्पण केले होते. आलिया-वरुण आधीच मुलींचे पालक आहेत आणि आता सिद्धार्थही या गँगमध्ये सामील झाला आहे. वृत्तानुसार, कियारा आणि त्यांची मुलगी दोघीही सुखरूप आहेत. मुलीचा जन्म मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात नॉर्मल डिलिव्हरीद्वारे झाला आहे.
सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणी यांच्या घरी मुलीचा जन्म झाला असून दोघेही खूप आनंदी आहेत. दोघांनी त्यांच्या लग्नाच्या दुसऱ्या वर्धापनदिनापूर्वी गरोदरपणाची घोषणा केली होती. त्यांनी पोस्ट शेअर करत लिहिले होते- आमच्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट. या बातमीची अधिकृत माहिती त्यांनी इंस्टाग्राम पोस्ट शेअर करून दिली आहे. चाहते सोशल मीडियावर त्यांना शुभेच्छा देत आहेत. सिद्धार्थचे पालकही दिल्लीहून मुंबईला आले आहेत आणि आजी-आजोबा होण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून दिसून येत आहे.
'स्टुडंट ऑफ द इयर'च्या गँगमध्ये आलिया भट्ट प्रथम आई झाली होती. ६ नोव्हेंबर २०२२ रोजी आलियाला प्रसूतीसाठी मुंबईतील सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. तिने एका निरोगी बाळाला जन्म दिला. तिने तिच्या मुलीचे नाव राहा ठेवले, ज्याचा खुलासा तिने २४ नोव्हेंबर २०२२ रोजी केला होता. तर, गेल्या वर्षी डिसेंबर २०२४ मध्ये वरुण धवनने त्यांची मुलगी लाराचा वाढदिवस साजरा केला होता. वरुण आणि नताशा दलाल यांना ३ जून रोजी मुलगी झाली होती. आता सिद्धार्थ मल्होत्राही मुलीचा बाबा बनून या गँगमध्ये सामील झाला आहे.
सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणीची पहिली भेट एका पार्टीत झाली होती, पण त्यांचे प्रेम 'शेरशाह' चित्रपटात एकत्र काम करताना फुलले. मात्र, डेटिंगच्या काळात या जोडीने कधीही त्यांच्या नात्याचा खुलासा केला नाही. त्यानंतर ७ फेब्रुवारी २०२३ रोजी दोघांनी राजस्थानच्या जैसलमेरमध्ये थाटामाटात लग्न केले. नंतर मुंबईत एक भव्य रिसेप्शनही दिले होते.