सलमान खानला काळवीट शिकारच्या प्रकरणात माफी मागणार नाही असे स्पष्टपणे अभिनेत्याचे वडील सलीम खान यांनी एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. याशिवाय, सलमान खानने काहीही चुकीचे केलेले नाही असे देखी सलीम यांनी सांगितले.
Salim Khan on Lawrence Bishnoi : सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) आणि गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईमधील वाद थांबण्याचे नावच घेतले जात नाहीये. एका बाजूला लॉरेन्स बिश्नोई सातत्याने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देत आहे. याशिवाय सलमान खानने वर्ष 1998 मध्ये काळवीट शिकार प्रकरणात माफी मागावी अशी मागणीचा तगादाही लॉरेन्स बिश्नोईने लावला आहे. दुसऱ्या बाजूला सलमान माफी न मागण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. या प्रकरणात खास गोष्ट अशी की, सलमान खानसोबत संपूर्ण परिवार त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे. अशातच एका मुलाखतीत सलमान खानचे वडील सलीम खान यांनी एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, सलमान खान काळवीट शिकार प्रकरणात माफी मागणार नाही. याशिवाय सलमानने काही चुकीचे देखील केलेले नाही.
काळवीट शिकारवेळी उपस्थितीत नव्हता सलमान?
सलीम खान यांना काळवीट शिकार प्रकरणाबद्दल प्रश्न विचारला. यावेळी सलीम खान यांनी मुलाखतीत म्हटले की, "काळवीट शिकारवेळी सलमान खान तेथे उपस्थितीत नव्हता. याशिवाय सलमान खानलाही याबद्दल मी विचारले असता त्याने म्हटले होते की, मी तेथे नव्हतो. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा कारमध्ये देखील नव्हता. मला माहितेय माझा मुलगा खोटं बोलणार नाही."
सलमाने आयुष्यात झुरळंही मारले नाही…
सलीम यांनी मुलाखतीत पुढे म्हटले की, सलमान खानला शिकार करणे आवडत नाही. तो पशू-प्राण्यांवर प्रेम करतो. सलीम खान यांनी असाही दावा केला की, सलमानने आजपर्यंत एक झुरळंही मारले नाही. आपल्या मित्रपरिवारासोबत नेहमीच दयेने आणि प्रेमाने वागतो. हीच सलमानची ओखळ आहे.
सलमान खान का मागत नाहीये माफी?
मुलाखतीदरम्यान सलीम खान यांनी लॉरेन्स बिश्नोई गँगकडून मिळणाऱ्या धमक्यांबद्दल भाष्य केले. सलीम खान यांनी म्हटले की, "सलमान खानला माफी मागण्याची काहीही गरज नाही. कारण सलमानने काही चुकीचे केलेले नाही. खरंतर, संपूर्ण परिवार तणावाखाली आहे. पण आम्ही काय करू शकतो. सलमानने माफी मागावी अशी बिश्नोई गँगकडून मागणी केली जात आहे. पण सलमानने का माफी मागावी असा सवालही सलीम यांनी मुलाखतीवेळी उपस्थितीत केला. एवढेच नव्हे प्रत्येक दिवशी शिकार होत असल्याच्या घटना समोर येतात. खरंतर, आम्ही कधीच बंदूकीचा वापर केलेला नाही तर माफी कोणत्या गोष्टीची मागायची?. माफी मागण्याचा अर्थ असा होतो की, तुम्ही काहीतरी चुकीचे केले आहे."
लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सलमानला नवी धमकी
18 ऑक्टोबरला मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअॅपवर एक मेसेज आला होता. या मेसेजमध्ये सलमानकडे पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. जेणेकरुन लॉरेन्स बिश्नोईसोबतची दुश्मनी संपली जाईल. असे न केल्यास बाबा सिद्दिकी यांच्यापेक्षा अतिशय वाईट स्थिती करु अशी धमकीही मेसेजमध्ये देण्यात आली होती. या प्रकरणात सध्या मुंबई पोलिसांकडून वरळी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय मुंबई पोलिसांकडून अधिक तपास सुरु करण्यात आला आहे.
आणखी वाचा :
राधिका मर्चेंटच्या वाढदिवसावेळी आकाश अंबानीने केक खाण्यास दिला नकार? पाहा Video
लॉरेन्स बिष्णोईला सलमान खानची Ex Girlfriend करणार कॉल, प्रकरण काय?