
Radhika Merchant 30th Birthday Video : अनंत अंबानीसोबत लग्न करुन अंबानी परिवाराची सून झालेल्या राधिका मर्चेंटचा सासरी मोठ्या दिमाखात 30 वा वाढदिवस पार पडला. अँटेलियात राधिकाच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन ठेवण्यात आले होते. यावेळी अंबानी, मर्चेंट परिवारासह, जान्हवी कपूर, एमएस धोनी, अनन्या पांडे, सुहाना, आर्यन खान, ऑरी, रणवीर सिंहसह अन्य पाहुण्यांनी उपस्थिती लावली होती. राधिकाच्या वाढदिवसाचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.
राधिकाच्या वाढदिवसाचे खास क्षण
राधिकाच्या वाढदिवसाचे काही फोटो ऑरीने सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. याशिवाय एका व्हिडीओमध्य राधिका मर्चेंट लाल रंगातील केक कापून वाढदिवस सेलिब्रेट करताना दिसतेय.
आकाशने केक खाण्यास नकार दिला, पण का?
राधिकाने वाढदिवसाचा केक कापल्यानंतर सर्वप्रथम अनंत अंबानीला भरवला. याशिवाय घरातील मंडळींनाही राधिकाने केक दिला. रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक मुकेश अंबानीचीही राधिकाच्या वाढदिवसावेळी उपस्थिती दिसून आली. केक एकएक व्यक्तीला भरवत राधिकाने आकाश अंबानीला केक विचारला असता त्याने नकार दिला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. यावेळी आकाशने राधिकाच्या हातून केक खाण्यास नकार दिल्याचे व्हिडीओमध्ये दिसतेय. पण याचवेळी आकाशने आजी कोकिलाबेन अंबानी यांना हात धरुन पुढे आणले. यावेळी आकाशने सर्वप्रथम कोकिलाबेन यांना केक देण्यास सांगितले. याशिवाय पूर्णिमा दलाल यांनाही केक खाण्यासाठी पुढे बोलावण्यात आले.
राधिकाचा सासरी पहिला वाढदिवस
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांनी 12 जुलै 2024 रोजी एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली. अशातच पहिल्यांदाच सासरी राधिकाने आपला वाढदिवस साजरा केल्याचे काही फोटो-व्हिडीओ समोर आले आहेत.
राधिकाचा वाढदिवसावेळचा लूक
राधिकाने वाढदिवसावेळी पांढऱ्या रंगातील सिल्कचा हॉल्टर नेक टॉप आणि लाल रंगातील सुंदर असा स्कर्ट परिधान केला होता. पार्टीला मुकेश अंबानी, नीता अंबानी, श्लोका मेहता, आकाश अंबानी, इशा अंबानी, आनंदर पिरामल आणि राधिकाचे आई-वडील आणि बहिण अंजली मर्चेंटही आली होती.
आणखी वाचा :
ऐश्वर्या रायला मागे टाकत ही ठरली भारतातील सर्वाधिक Richest Actress
लॉरेन्स बिष्णोईला सलमान खानची Ex Girlfriend करणार कॉल, प्रकरण काय?