मुंबई : बॉक्स ऑफिसवर सध्या वॉर 2 आणि कुलीचा बोलबाला आहे. या दोन्ही चित्रपटांच्या त्सुनामीतही सैयारा आणि महावतार नरसिम्हा हे दोन चित्रपटही चांगली कमाई करत आहेत. दोन्ही चित्रपटांना प्रदर्शित होऊन जवळपास एक महिना झाला आहे.
अहान पांडे आणि अनीत पड्डा यांचा 'सैयारा' हा चित्रपट १८ जुलै रोजी प्रदर्शित झाला होता. चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांना आकर्षित केले. या चित्रपटाने कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातील हिरो आणि हिरोईन नवखेच आहेत.
26
सैयाराचे बॉक्स ऑफिस कलेक्शन
'सैयारा'ला प्रदर्शित होऊन ३१ दिवस झाले आहेत. चित्रपटाने ३१ व्या दिवशी ६३ लाखांची कमाई केली. चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ३२४.५ कोटींचा व्यवसाय केला आहे.
36
पहिल्या आठवड्यातच दिडशेचा पल्ला पार
सैयाराने सुरुवातीचे तीन दिवस चांगली कमाई केली. पहिल्या आठवड्यात १७२.७५ कोटींचा व्यवसाय केला. दुसऱ्या आठवड्यात १०७.७५ कोटींची कमाई केली.
दिग्दर्शक अश्विन कुमार यांचा अॅक्शन, अॅडव्हेंचर, अॅनिमेटेड चित्रपट 'महावतार नरसिम्हा' २५ जुलै रोजी प्रदर्शित झाला.
56
महावतार नरसिम्हाचे कलेक्शन
महावतार नरसिम्हाने २४ व्या दिवशी ८ कोटींचा व्यवसाय केला. चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत २१०.३५ कोटींची कमाई केली आहे.
66
वॉर 2 आणि कुलीचे कलेक्शन
१४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेले 'वॉर 2' आणि 'कुली' बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहेत. 'वॉर 2' ने भारतीय बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत १७३.६० कोटींचा व्यवसाय केला आहे.