मुंबई - War 2, कुली, महाअवतार नरसिम्हा आणि सैय्यारा या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. War 2 ने २१५ कोटी, कुली ने ३१९ कोटी, महाअवतार नरसिम्हा ने २०८ कोटी, सैय्यारा ने ३३० कोटींची कमाई केली. गेल्या आठवड्यात चिंत्रपटांनी उत्तम कमाई केली.
Box Office Collection १७th august: रविवारी गाजत असलेल्या ४ चित्रपटांनी किती कमाई केली?
आतापर्यंत सैय्यारा, कुली, महाअवतार नरसिम्हा आणि वार २ चित्रपटांनी तिकीटबारीवर चांगली कमाई केली आहे. सैयारा हा चित्रपट अजूनही तिकीट बारीवर चांगला सुरु आहे.
25
War 2
War २ हा चित्रपट शुक्रवारी रिलीज झाला असून त्यानं आतापर्यंत चांगली कमाई केली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने २१५ कोटींची जागतिक पातळीवर कमाई केली असून भारतात १४२ कोटी कमावले आहेत.
35
Coolie
कुली हा रजनीकांतचा चित्रपट असल्यामुळं त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. या चित्रपटाने आतापर्यंत भारतात १९४ कोटी आणि जगभरात ३१९ कोटींची कमाई केली आहे.
45
Mahavatar Narsimha
ऍनिमेटेड चित्रपटांच्या यादीमध्ये महाअवतार नरसिम्हा हा चित्रपट चांगला चालला आहे. या चित्रपटाने आजपर्यंत २०० कोटींचा टप्पा पार केला असून २०८ कोटींची कमाई केली आहे.
55
Saiyaara
सैय्यारा हा चित्रपट तरुणाईने मोठ्या प्रमाणावर उचलून धरला असून त्याचा फॅन बेस मोठा तयार झाला आहे. या चित्रपटाने रविवारी ८ कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत सैय्यारा चित्रपटाची कमाई ३३० कोटींपर्यंत जाऊन पोहचली आहे.