सैराटमधील तानाजी गलगुंडेला कसा झाला आयबीएस नावाचा विकार

Published : Jun 16, 2026, 08:48 PM IST
tanaji galgunde sairat

सार

सैराट लंगड्या नावाचं पात्र म्हणजेच, अभिनेता तानाजी गलगुंडे याला आयबीएस नावाचा विकार झाल्याचं त्याने स्वत:हून सांगितले, तसेच हा कशामुळे होतो, आणि त्यातून तो कसा बाहेर आला, हे सर्वकाही तानाजी गलगुंडे याने सांगितलं.

मुंबई : सैराट सिनेमाला येऊन 10 पेक्षा जास्त वर्ष झाले, तरी त्यातील कलाकार अजूनही सर्वांच्या आठवणीत आहेत. यातील लंगड्या नावाचं पात्र तानाजी गलगुंडे हे तेवढंच लोकप्रिय आहे. पण तानाजी गलगुंडे यांनी एका मुलाखतीत बोलताना सांगितलं की, त्याला आयबीएस नावाचा विकार कसा झाला आणि त्यातून तो बाहेर कसा आला, तसेच तो कसं याबद्दल पथ्य पाळतो, हे त्याने सांगितलं. सैराट सिनेमा सुपर हिट झाल्यानंतर तानाजी गलगुंडे आणि सैराट टीमने मोठ्या प्रमाणात प्रमोशन केलं.

पचनसंस्थेवर गंभीर परिणाम

IBS (Irritable Bowel Syndrome) हा पचनसंस्थेशी संबंधित दीर्घकालीन विकार आहे. सैराटच्या प्रमोशन दरम्यान, रात्र रात्र जागणे, बाहेरचं खाणे, वेळेवर न जेवणे, दिवसा झोपणे आणि रात्री उशीरापर्यंत फिरणे, मॅगी खाणे, दिवस दिवस मॅगी खाऊन खाणे, यामुळे पचनसंस्थेवर गंभीर परिणाम झाले. यातून तानाजी गलगुंडे याला आयबीएस या पंचनसंस्थेच्या आजाराचा सामना करावा लागला. यातून तो बाहेर आला.

दीर्घकालीन हा विकार असल्याने खूप काही पथ्य पाळावे लागले, यामुळे तानाजी गलगुंडे हा फूड ब्लॉगर म्हणून जरी काम करत असला तरी तो बाहेरचं खाणं मात्र टाळतोय.यामागे हेच कारण आहे. तानाजी गलगुंडे या मुलाखतीत भरभरुन सर्व विषयांवर मोकळेपणाने बोलला आहे.

शेतातल्या पार्ट्या, हुर्डा, खवा पार्टी

तानाजी गलगुंडे याने ग्रामीण भागातील शेतातल्या पार्ट्या, हुर्डा, खवा पार्टी याविषयी रंजक माहिती दिली आहे. शहरी भागातील लोकांसाठी ही एक नवीन आणि कुतूहल निर्माण करणारी माहिती आहे. सैराट प्रसिद्धीला आल्यानंतर पहिली 4 ते 5 वर्ष ग्लॅमरच्या नावाखाली कशी वाया घालवली, तसेच आम्ही आले ते रोल त्या वेळी करायला हवे होते.

सैराटच्या प्रसिद्धीच्या लाटेवर स्वार होता आले नाही

चांगला सिनेमा, चांगली भूमिका या नादात ती वेळ कशी निघून गेली ते कळलंच नाही किंवा आम्हाला तसं आमची जी टीम नेमली होती, त्यांच्याकडून पाहिजे तसं मार्गदर्शन झालं नाही, असंही मला वाटतं. म्हणून ग्रामीण भागात एक म्हण आहे, बहेती गंगा मे हात धो लो, तर तेव्हा जो ट्रेंन्ड होता सैराटचा त्यावर आम्हाला तसं स्वार होता आलं नाही, दिवसाला भूमिकेसाठी एकतरी फोन येत होता, तेव्हा त्या भूमिका स्वीकारुन पुढे जायला हवं होतं.तानाजीने या पश्चाताप बोलून दाखवला.

सैराटच्या भूमिका आणि नागराज मंजुळे याच्याशी कशी ओळख झाली याविषयी देखील तानाजी बोलला आहे. अगदी मुक्त आणि मनमोकळ्या गप्पा करत ही मुलाखत पार पडली आहे. एखाद्या प्रसिद्ध भूमिकेनंतर कलाकाराची पुढचं आयुष्य कसं असावं, किंवा तो कोणत्या दृष्टीकोनातून या जगाकडे पाहतोय, हे तानाजीच्या भूमिकेतून स्पष्ट झालं आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Entertainment: नात 'दुआ' बंगळूरला गेल्यावर काय करते? आजोबांनीच उलगडले रहस्य
देऊळ बंद २ चित्रपटाने २०२६ मध्ये केली दमदार कमाई, आकडा वाचून व्हाल थक्क