चाकू हल्ल्यावर सैफ अली खानचे विधान जारी, मीडिया & चाहत्यांना धीर धरण्याची विनंती

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान यांच्या बांद्रातील राहत्या घरी हल्ला झाला आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर शस्त्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी घटनेची चौकशी सुरू केली आहे.

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान यांनी त्यांच्या बांद्रातील राहत्या घरी झालेल्या हल्ल्याच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. एका अधिकृत निवेदनात, अभिनेता सैफ अली खानचे प्रतिनिधी म्हणाले, "सैफ अली खान यांच्या राहत्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ते सध्या रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी दाखल आहेत. आम्ही मीडिया आणि त्यांच्या चाहत्यांना विनंती करतो की ते संयम बाळगावे. हे एक पोलीस प्रकरण आहे आणि आम्ही परिस्थितीबाबत तुम्हाला नियमितपणे अपडेट देत राहू."

ही घटना गुरुवारच्या मध्यरात्री घडली, जेव्हा एका चोराने खान यांच्या घरी प्रवेश केला.

वृत्तानुसार, अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी प्रवेश केल्यावर त्या व्यक्तीने त्यांच्या नोकराशी वाद घातला. अभिनेता सैफ अली खान यांनी त्याच्या वादात हस्तक्षेप केला तेव्हा त्या व्यक्तीने त्यांना हल्ला करून जखमी केले. मुंबई पोलिसांनी दिलेल्या निवेदनात म्हटले, "एक अनोळखी व्यक्ती अभिनेता सैफ अली खान यांच्या घरात घुसला आणि रात्री उशिरा त्यांच्या नोकराशी वाद घातला. अभिनेता सैफ अली खान यांनी त्या व्यक्तीस शांत करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्या व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला आणि जखमी केले. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत."

तसेच, इतर काही अहवालांमध्ये असे सांगितले गेले होते की अभिनेता सैफ अली खान यांना धारदार शस्त्राने जखमी केले आहे, तर पीटीआय ने दिलेल्या अहवालानुसार, "बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान यांना त्यांच्या मुंबईतील राहत्या घरी एका अज्ञात व्यक्तीने चाकूने वार करून जखमी केले," असे सांगितले आहे.

ही घटना रात्री २:३० वाजता घडली, त्यानंतर आरोपी फरार झाला आणि त्याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणावर एफआयआर नोंदवण्यात येईल आणि मुंबई क्राईम ब्रांच ही या घटनेची समानतर चौकशी करत आहे.

अभिनेता सैफ अली खान यांना ६ जखमा झाल्या आहेत, ज्यापैकी दोन जखमा खोल होत्या आणि एक जखम त्याच्या मणक्याजवळ होती. अशा गंभीर जखमांच्या पार्श्वभूमीवर, अभिनेता सैफ अली खान यांना रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले आहे.

 

Share this article