
Saif Ali Khan attacked with knife : बॉलिवूडमधील अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाल्याची बातमी समोर येत आहे. मुंबईतील वांद्रे येथील घरी बुधवारी (15 जानेवारी) मध्यरात्री सैफच्या घरात चोर घुसला आणि त्याच्यावर धारधार शस्राने हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यामध्ये सैफ अली खान जखमी झाला आहे. सध्या सैफला लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सैफवर झालेल्या हल्ल्यामुळे वांद्रे पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे. हैराण करणारी बाब अशी की, चोराने सैफवरच हल्ला करत पळ काढला आणि त्याला कोणीही पाहिले नाही. पोलिसांकडून आता सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले जात आहेत. पण असा प्रश्न उपस्थितीत होतोय की, कठोर सुरक्षा असतानाही हल्लेखोर सैफच्या घरात कसा शिरला गेला.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार, सैफ आणि हल्लेखोरामध्ये झटापट झाली. यावेळी हल्लेखोराने सैफवर धारधार शस्राने हल्ला केला. यामुळे सैफ अली खान जखमी झाला. सैफला सध्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सैफवर हल्ला का केला याचा अधिक तपास आता मुंबई पोलिसांकडून केला जात आहे. या प्रकरणात पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या एफआयआर दाखल करत त्याचा शोध घेतला जात आहे.
आणखी वाचा :
२०२५ मधील सर्वाधिक प्रतीक्षित चित्रपटांची यादी
अनुष्का-विराटच्या अलिबाग बंगल्याची झलक- Inside PHOTOS