
मुंबई | प्रतिनिधी अभिनेत्री सई ताम्हणकरने अलीकडील एका मुलाखतीत पाकिस्तानविरोधात आपली ठाम भूमिका मांडली आहे. सध्याच्या भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर, बॉलिवूडमधील अनेक कलाकार शांत राहिले असताना, सईने पाकिस्तानचं थेट नाव घेतलं आणि स्पष्ट भाषेत आपलं मत व्यक्त केलं.
"युद्ध हे उत्तर नाही, पण..." सईने 'बॉलिवूड बबल'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "जेव्हा अशा गोष्टी घडतात, तेव्हा अनेक निरपराध नागरिकांना त्याचे परिणाम भोगावे लागतात. मला मनापासून वाटतं की युद्ध हे कशाचंही उत्तर नाही. मात्र, काही लोकांना सरळ भाषा कळत नाही. काही लोक म्हणजे पाकिस्तान. अशा परिस्थितीत काही पावलं उचलावी लागतात."
कलेची स्वतंत्रता आणि आशावाद पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याबाबत विचारले असता, सईने सांगितले की, "कला ही वेगळी ठेवली पाहिजे. कलेची स्वतःची भाषा आहे. त्यात कोणतेही अडथळे नसावेत. मी आशावादी आहे आणि मला वाटतं की हे सगळं संपलं की, त्यासोबतच्या गोष्टीही संपतील."