कथित 'रेशन वितरण घोटाळ्याच्या' चौकशीच्या संदर्भात ईडीने बंगाली अभिनेत्री रितुपर्णा सेनगुप्ताला समन्स बजावले आहे. वृत्तानुसार, अभिनेत्रीला कोलकाता येथील ईडी कार्यालयात अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
बंगाली अभिनेत्री रितुपर्णा सेनगुप्ताच्या अडचणीत वाढ झाली आहे. गुरुवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अभिनेत्रीला समन्स बजावले. पश्चिम बंगालमधील कथित 'रेशन वितरण घोटाळ्याच्या' तपासासंदर्भात अभिनेत्रीला 5 जून रोजी ईडी अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. वृत्तानुसार, एका अधिकाऱ्याने सांगितले की, बंगाली अभिनेत्रीला कोलकाता येथील ईडी कार्यालयात अधिकाऱ्यांसमोर हजर व्हावे लागेल. अभिनेत्री सध्या वैयक्तिक कारणास्तव अमेरिकेत असल्याचे बोलले जात आहे.
पश्चिम बंगालचे मंत्री ज्योतिप्रियो मल्लिक यांना रेशन घोटाळ्याप्रकरणी अटक :
अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी गुरुवारी रात्री पश्चिम बंगालचे मंत्री ज्योतिप्रियो मल्लिक यांना त्यांच्या निवासस्थानी झडती घेतल्यानंतर अटक केलीय. कोट्यवधी रुपयांच्या कथित रेशन वितरण घोटाळ्याच्या चौकशीच्या अनुषंगानं हा छापा टाकण्यात आला होता. ईडीनं केंद्रीय पथकाच्या मदतीनं कोलकाता येथील सॉल्टलेक परिसरात राज्याचे वनमंत्री मल्लिक यांच्या दोन घरांवर छापे टाकले होते.
रितुपर्णा सध्या अमेरिकेत :
ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रितुपर्णा सध्या अमेरिकेत आहे. तिला बुधवारी ई-मेलद्वारे बोलावण्यात आले. मात्र, ईडीच्या नोटीसबाबत रितुपर्णा यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. रेशन भ्रष्टाचार प्रकरणात, ईडीने राज्याचे माजी अन्न मंत्री ज्योतिप्रिया मल्लिक, बोनगाव नगरपालिकेचे माजी अध्यक्ष शंकर आध्ये, रेशन व्यापारी बकीबुर रहमान आणि त्यांच्या निकटवर्तीयांसह सत्ताधारी पक्षाच्या काही नेत्यांना आधीच अटक केली आहे.
रोझ व्हॅली प्रकरणात ईडीने रितुपर्णाची चौकशी :
यापूर्वी जुलै 2019 मध्ये, रोझ व्हॅली प्रकरणाचा तपास करणाऱ्या ईडीने रितुपर्णा आणि अभिनेता प्रसनजीत चॅटर्जी यांची चौकशी केली होती. एकेकाळी रोझ व्हॅली कंपनीतर्फे अनेक बंगाली चित्रपटांची निर्मिती होत असे. त्यावेळी संस्थेचे प्रमुख गौतम कुंडू यांनी रितुपर्णाशी संपर्क साधल्याचे ईडीकडून सांगण्यात आले होते. रोझव्हॅली ग्रुपने नंतर टॉलीवूड अभिनेत्रीच्या एजन्सीसोबत करार केला. गौतमच्या कंपनीने तयार केलेल्या काही चित्रपटांमध्येही रितुपर्णाने काम केले. पाच वर्षांपूर्वी ईडीने त्यांना सॉल्ट लेक येथील सीजीओ कॉम्प्लेक्समध्ये बोलावून कंपनीशी संबंधित आर्थिक व्यवहारांची माहिती गोळा केली होती.
आणखी वाचा :
खलनायिकेची भूमिका करूनही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे ही अभिनेत्री