
Ranbir Kapoor Alia Bhatt Bungalow : रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा नवीन बंगला जवळपास तयार झाला आहे. मुंबईच्या पॉश एरियामध्ये असलेला हा ६ मजली बंगला आपल्या भव्य आणि मॉडर्न स्टाइलमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. रणबीर आणि आलियासोबत अनेकदा नीतू कपूर यांनाही पाहणी करताना पाहिले गेले आहे. आता, फराह खानने तिच्या व्लॉगमध्ये, रिद्धिमा कपूर साहनीच्या हवाल्याने या बंगल्यात सिद्धिमाची एक खोली असल्याचे सांगितले आहे.
फराह खानने तिच्या अलीकडील व्लॉगमध्ये रिद्धिमा कपूरच्या दिल्लीतील बंगल्याला भेट दिली. रणबीरनंतर रिद्धिमाच्या बंगल्याची भव्यता पाहून ती थक्क झाली. 'मैं हूं ना' चित्रपटाच्या दिग्दर्शिकेने तिला विचारले की, रिद्धिमाला रणबीर कपूर-आलिया भट्टच्या बंगल्यात जागा मिळेल का? यावर अभिनेत्रीने खुलासा केला, "हो, तिथे माझी स्वतःची खोली आहे."
रिद्धिमाने पुढे सांगितले, "माझ्या आईसाठी संपूर्ण एक मजला आहे. एक खोली भरत आणि माझ्यासाठी आहे, आणि दुसरी समारासाठी. तिला आम्हा सर्वांना तिच्याजवळ ठेवायचे आहे." तिची आई आणि अभिनेत्री नीतू कपूर यांच्याबद्दल बोलताना रिद्धिमाने सांगितले की, ती त्यांच्यावर खूप प्रेम करते. "आता माझ्याकडे फक्त त्या आहेत. आम्हाला त्यांचे लाड करणे आणि एकत्र फिरणे खूप आवडते."
काही आठवड्यांपूर्वी, रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या आलिशान नवीन घराचा एक व्हिडिओ फॅन पेजवर पोस्ट झाल्यानंतर व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये त्यांच्या नवीन बंगल्याच्या आतील भागाची झलकही दाखवण्यात आली होती, आणि ही गोष्ट आलियाला आवडली नाही. तिने सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांना चांगलेच सुनावले होते. तसेच व्हिडिओ फॉरवर्ड न करण्याची विनंतीही केली होती. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला आहे की, या बंगल्याची जमिनीसह किंमत सुमारे २५० कोटी रुपये आहे.
तिने पुढे लिहिले की, तिच्या घराचा एक व्हिडिओ अनेक प्लॅटफॉर्मवर तिच्या माहितीशिवाय किंवा परवानगीशिवाय सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे, आणि हे "गोपनीयतेचे उल्लंघन" आणि "गंभीर सुरक्षेचा मुद्दा" आहे. तिने म्हटले की, परवानगीशिवाय कोणाच्या खाजगी जागेचा व्हिडिओ बनवणे किंवा त्याचे फोटो घेणे हे कंटेंट मानले जात नाही आणि हे उल्लंघन आहे, आणि याला कधीही सामान्य मानले जाऊ नये.