रिंकू राजगुरूचा 'बेटर हाफ' २२ ऑगस्टला येणार, सुबोध भावे यांच्या वयाच्या अंतरावर ती काय म्हणाली?

Published : Aug 17, 2025, 03:00 PM IST
rinku rajguru and subodh bhave

सार

अभिनेत्री रिंकू राजगुरू, प्रार्थना बेहेरे आणि सुबोध भावे यांचा 'बेटर हाफ' हा चित्रपट २२ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात रिंकू आणि सुबोध यांच्यातील वयाच्या अंतरावरून रिंकूने भाष्य केले आहे.

अभिनेत्री रिंकू राजगुरू प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बेटर हाफची लव्ह स्टोरी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री रिंकू राजगुरू, प्रार्थना बेहेरे आणि सुबोध भावे हे चित्रपटातून भेटीस येणार आहे. या चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस २२ ऑगस्ट रोजी येणार आहे. रिंकू राजगुरूंच्या मुलाखतीमध्ये ही माहिती दिली आहे.

रिंकू राजगुरू काय म्हणाली? 

रिंकू राजगुरूने कमेंट्सवरून बोलताना उत्तर दिलं आहे. रिंकू आणि सुबोध खूप जास्त वयाचं अंतर असल्याचं तिने बोलताना सांगितले आहे. त्यावर बोलताना रिंकू म्हणाली की, चित्रपटाची मागणी तशी आहे. चित्रपटातसुद्धा आम्ही साकारलेल्या पात्रांमध्ये वयाचं तितकंच अंतर आहे. असं म्हणतात, की प्रेम आंधळं असतं आणि वय बघून प्रेमात पडत नाही. तशी ती मुलगी प्रेमात पडते. अशा बऱ्याच गोष्टी चित्रपटात आहे.

चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला 

काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा ट्रेलर लॉंच करण्यात आला होता. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. आता चित्रपटाला कसा मिळणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. रिंकू राजगुरूने सैराट चित्रपटातून स्वतःची ओळख तयार केली होती. त्यानंतर तिने झिम्मा २, आशा, झुंड, कागर या चित्रपटातून पदार्पण केलं होत.

नुकताच त्याला आशा चित्रपटातील भूमिकेसाठी महाराष्ट्र चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. प्रार्थना बेहेरे आता चित्रपटातून पदार्पण केलं आहे. सुबोध भावे हे त्यांच्या विविध धाटणीच्या भूमिकांसाठी ओळखले जातात. त्यांचे अनेक चित्रपट गाजले असून या मालिकेत त्यांनी समर ही भूमिका साकारली आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

700 कोटींची मालकीण अभिनेत्री, 10 वर्षांनी लहान मुलाशी केले लग्न, वाचा बेडरुम सिक्रेट?
10 भाषांमध्ये 90 चित्रपट, पण 50 वर्षांनीही सर्वांना आवडणारी अविवाहित अभिनेत्री कोण?