दिलखुलास हसणारी आमची आई... तेजस्वी पंडितने आईच्या निधनानंतर टाकली भावूक स्टोरी

Published : Aug 17, 2025, 02:30 PM IST
tejsvini pandit

सार

ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 69 व्या वर्षी निधन झाले. त्या अभिनेत्री तेजस्वी पंडित यांच्या आई होत्या. त्यांच्या पार्थिवावर उद्या पुण्यात अंत्यसंस्कार होतील.

अभिनेत्री तेजस्वी पंडितची आई ज्योती चांदेकर यांचं निधन झालं. त्या 69 वर्षांच्या होत्या. आज १७ ऑगस्ट सकाळी ११ वाजता पुण्यातील नवी पेठ वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ज्योती चांदेकर या मूळ पुण्यातील राहणाऱ्या आहेत. आईच्या निधनानंतर तेजस्वीने सोशल मीडियावरून पोस्ट करून माहिती दिली आहे.

तेजस्विनी पोस्टमध्ये काय म्हणते? 

‘नमस्कार, कळवण्यास अत्यंत दु:ख होत आहे की, मनमुराद जगणारी आणि दिलखुलास हसणारी आमची आई तसंच सर्वांची लाडकी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती ज्योती चांदेकर पंडित यांचं वयाच्या 69 व्या वर्षी आज 16 ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने दु:खद निधन झालं आहे. त्यांचे अंत्यसंस्कार उद्या, 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता, नवी पेठ वैकुंठ स्मशानभूमी, पुणे इथं होणार आहेत’, असं तेजस्विनीने म्हटलं आहे.

या घटनेमुळं तेजस्वीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या आईच्या भूमिकेची सुरुवात एका हिंदी चित्रपटातील छोट्या भूमिकेपासून झाली होती. अमिताभ बच्चन यांची भूमिका असलेल्या ‘एक नजर’ या चित्रपटाचं शूटिंग पाहण्यासाठी त्या वडिलांसोबत गेल्या होत्या. दिग्दर्शकाने दिलेल्या काही ओळी सहजगत्या वाचल्यानंतर ‘या मुलीला मेकअप करण्यासाठी न्या’ असं दिग्दर्शकाने सांगताच त्यांच्या अभिनयाची कारकीर्द सुरू झाली.

ज्योती यांनी कोणत्या नाटकांमध्ये काम केलं? 

त्यांनी ‘सुंदर मी होणार’, ‘करायला गेलो एक’, ‘वऱ्हाडी माणसं’, ‘स्वयंसिद्धा’ यांसारख्या नाटकांमध्येही काम केलंय. ज्योती यांनी अनेक चित्रपटांमधून आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. मी सिंधूताई सपकाळ’, ‘पाऊलवाट’, ‘सुखान्त’, ‘गुरू’, ‘ढोलकी’, ‘तिचा उंबरठा’, ‘दमलेल्या बाबाची कहाणी’, ‘सलाम' या नाटकांमधून ज्योती यांनी काम केलं आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

700 कोटींची मालकीण अभिनेत्री, 10 वर्षांनी लहान मुलाशी केले लग्न, वाचा बेडरुम सिक्रेट?
10 भाषांमध्ये 90 चित्रपट, पण 50 वर्षांनीही सर्वांना आवडणारी अविवाहित अभिनेत्री कोण?