रश्मीका मंदाना: रश्मीका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या साखरपुड्याच्या चर्चांना उधाण आले असताना, तिचा पूर्वीचा बॉयफ्रेंड रक्षित शेट्टी पुन्हा चर्चेत आला आहे. रक्षितने त्यांच्या नात्याबद्दल आणि रश्मीकाच्या स्वप्नांबद्दल एक विधान केले आहे.
रश्मिका मंदानाचा 'या' अभिनेत्यासोबत झाला होता साखरपुडा, तीच कौतुक करून तो म्हणाला की...
रश्मीका मंदाना गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आली आहे. तिचा विजय देवरकोंडासोबत साखरपुडा झाल्याची बातमी माध्यमांतून वाऱ्यासारखी पसरली. आता पार्ट एकदा तिचा पूर्वीचा बॉयफ्रेंड रक्षित शेट्टी हा चर्चेत आला आहे.
26
रक्षित शेट्टी आणि रश्मीका दोघे कधी भेटले?
रक्षित शेट्टी आणि रश्मीका मंदाना हे दोघे किरिक पार्टी या चित्रपटाच्या पार्टीच्या वेळेला भेटले होते. त्या दोघांनी एकमेकांना डेट केलं आणि नंतर साखरपुडा केला होता.
36
दोघांचा साखरपुडा का मोडला?
दोघांचा साखरपुडा हा ३ जुलै २०१७ ला झाला होता पण २०१८ मध्ये त्या दोघांचं नातं तुटलं. त्यामुळे रक्षित आणि रश्मीने यांचा विवाह झाला नाही. पण नातं तुटल्यानंतरही त्यांच्या नात्यात दुरावा आला नाही.
रक्षित म्हणाला की, 'मी आणि रश्मिका अजूनही काॅन्टॅक्टमध्ये आहोत. सिनेविश्वात नाव कमावणं हे तिचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न पूर्ण करण्याचा ती प्रयत्न करतेय आणि तिने जे ठरवलंय ते ती पूर्ण करणार'
56
आपण तीच कौतुक केलं पाहिजे
आपण तीच कौतुक केलं पाहिजे असं रक्षित पुढं मुलाखतीत बोलताना म्हणाला होता. साखरपुडा झाल्यानंतर रश्मीका आणि विजय या दोघांच्या अफेअरच्या चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरु झाल्या होत्या.
66
दोघे अनेकदा एकत्र दिसले होते
विजय आणि रश्मीका या दोघांना अनेकवेळा एकत्र पाहण्यात आलं होत. पण दोघांकडून अधिकृतरीत्या कधीही नात्याबद्दल सांगण्यात आलं नाही. सोशल मीडियावर दोघांचे एकाच जागेवरच फोटो दिसून आले होते.