सुपरस्टार रजनीकांत यांची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल, वाचा हेल्थ अपडेट

Rajinikanth Health Update : सुपरस्टार रजनीकांत यांना सोमवारी रात्री उशिरा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. खरंतर, अचानक पोटात दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर रजनीकांत यांची प्रकृती बिघडली गेली.

Chanda Mandavkar | Published : Oct 1, 2024 3:03 AM IST / Updated: Oct 01 2024, 08:34 AM IST

Rajinikanth Health Update : ‘वेट्टैयन’ सिनेमामुळे चर्चेत असणारे दिग्गज अभिनेते रजनीकांत यांची सोमवारी रात्री उशिरा अचानक प्रकृती बिघडी गेली. यामुळे तातडीने रजनीकांत यांना चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. असे सांगितले जात आहे की, 73 वर्षी. रजनीकांत यांच्या पोटात अचानक दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर घरातील मंडळींनी त्यांना रुग्णालयात भरती केले. डॉक्टरांनी रजनीकांत यांच्या आरोग्याचे अपडेट देत म्हटले की, त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. सुपरस्टारची प्रकृती बिघडल्याने चाहते मात्र चिंतेत पडले आहे.

रजनीकांत यांच्याबद्दल हेल्थ अपडेट
पीटीआयनुसार, रजनीकांत यांच्यावर मंगळवारी (01 ऑक्टोंबर) आरोग्यासंबंधित एका चाचणी केली जाण्याची शक्यता आहे. रजनीकांत यांच्यावर उपचार इंटरवेंशनल कार्डियोलॉजिस्ट डॉ. साई सतीश यांची टीम करत आहे. सध्या रजनीकांत यांची प्रकृती स्थिर आहे.

एक दशक आधी केले होते किडनी ट्रांसप्लांट
एक दशक आधी सुपरस्टार रजनीकांत यांनी सिंगापुरमध्ये किडनी ट्रांसप्लांट केले होते. यामुळेच अलीकडल्या काळात रजनीकांत यांनी आरोग्याच्या कारणास्तव राजकरणातून काढता पाय घेतला होता.

थलाइवा म्हणतात चाहते
साउथमध्ये रजनीकांत यांना नागरिक देवाप्रमाणे पूजतात. याशिवाय चाहते रजनीकांत यांना प्रेमाने थलाइवा असे म्हणतात. वर्ष 1978 मध्ये आलेल्या 'भैरवी' सिनेमानंतर रजनीकांत यांना खुप प्रसिद्धी मिळाली होती. यामुळेच रजनीकांत यांना थलाइवा म्हणण्यास चाहत्यांनी सुरुवात केली.

आगामी सिनेमे
रजनीकांत सध्या दोन सिनेमांमुळे चर्चेत आहेत. पहिला सिनेमा 'वेट्टैयन' 10 ऑक्टोंबरला रिलीज होणार आहे. रुग्णालयात दाखल होण्याआधीच रजनीकांत यांना आगामी सिनेमाच्या ऑडियो लाँचवेळी स्पॉट करण्यात आले होते. या सिनेमात रजनीकांत यांच्यासोबत अमिताभ बच्चनही झळकणार आहेत. वेट्टैयन हा रजनीकांत यांचा 170 वा असून त्यांचा दुसरा आगामी सिनेमा 'कुली' पुढील वर्षात रिलीज होणार आहे.

आणखी वाचा : 

मिथुन चक्रवर्तींचे बॉलिवूडमधील 8 धमाकेदार Movies, नक्की पाहा

मिथुन चक्रवर्तींना 'दादासाहेब फाळके पुरस्कार' घोषित, 8 ऑक्टोंबरला गौरवणार

Share this article