अक्षय कुमारनंतर आता आर माधवनचा पान मसाल्याच्या जाहिरातीसाठी नकार

Published : Aug 30, 2024, 11:26 AM ISTUpdated : Aug 30, 2024, 11:28 AM IST
actor Madhavan

सार

पान मसाल्याच्या जाहिरातीवरुन हृतिक रोशनवर नेटकऱ्यांनी जोरदार टिका केली होती. अशातच अक्षय कुमारनंतर आर माधवनकडून पान मसाल्याच्या जाहिरातीसाठी नकार दिला आहे.

R. Madhavan on Paan Masala Advertisement : पान मसाल्याच्या जाहिरातीसाठी कलाकारांना घेण्याचा विचार केला जातो. अजय देवगण, हृतिक रोशन, टायगर श्रॉफ, शाहरुख खान यांनी फ्लेवर्ड वेलचीच्या एका जाहिरातीत दिसून आले होते. अक्षय कुमारही दिसला होता पण त्याने पान मसालाच्या जाहिरातीतून स्वत:ला बाजू केले. याशिवाय हृतिक रोशनही या प्रकारची जाहिरात करताना दिसला होता. पण नेटकऱ्यांनी हृतिक रोशनवर जोरदार टिका केली. आता अशी बातमी समोर येत आहे की, आर माधवनला पान मसाल्याच्या ब्रँडसाठी विचारण्यात आले आहे.

आर माधवनचा जाहिरातीसाठी नकार
आर माधवनने पान मसाल्याच्या जाहिरातीसाठी स्पष्टपणे नकार दिला आहे. जाहिरातीसाठी मोठी रक्कमही आर माधनवला दिली जाणार होती. तरीही अभिनेत्याने जाहिरातीसाठी नकार दिला आहे. आर माधवनला प्रेक्षकांच्या प्रति आपली जबाबदारी समजते. अशा कोणत्याही गोष्टीशी आर माधवन स्वत:ला जोडून घेत नाहीये ज्यामुळे त्याच्या प्रेक्षकांना नुकसान पोहोचले जाईल.

सूत्रांनी माहिती देत असे म्हटले की, पान मसाला कंपनी आपला ब्रँड अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत होती. यासाठी एका मोठ्या चेहऱ्याचा शोध घेतला जात होता. आर माधवनला कंपनीने जाहिरातीसाठी मोठी रक्कम ऑफर केली होती. पण अभिनेत्याने जाहिरातीसाठी नकार दिला. दरम्यान, आता कंपनी पुन्हा एकदा नव्या मोठ्या चेहऱ्याच्या शोधात आहे.

जॉन अब्राहमची प्रतिक्रिया
जॉन अब्राहमने नुकत्याच पान मसाल्याची जाहिरात करणाऱ्या कलाकारांबद्दल विधान केले होते. जॉनने म्हटले होते की, मी माझ्या सर्व कलाकार आणि मित्रांचा आदर करतो. त्यांच्या अत्यंत जवळीक देखील आहे. पण मी कधीच त्यांना पान मसाल्याची जाहिरात करण्यासाठी शाबसकी देणार नाही. मला कोणाच्या आयुष्यासोबत खेळायचे नाही.

आर माधवनच्या कामाबद्दल…
आर माधवनच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास वर्ष 2024 मध्ये त्याची चर्चा झाली. अजय देवगणच्या 'शैतान' सिनेमात दिसला होता. या भूमिकेला प्रेक्षकांची पसंतीही मिळाली. आर माधवन लवकरच 'दे दे प्यार दे 2', 'धुरंधर' आणि 'Shankaran' सिनेमात झळकणार आहे. याशिवाय तमिळमधील 'Adhirshtasaali' आणि 'टेस्ट' सिनेमावर काम करत आहे. सध्या आर माधवन लंडनमध्ये असून ब्रिज सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

आणखी वाचा :

Kalki 2898 AD सिनेमात 81 वर्षांच्या अमिताभ बच्चनच्या धमाकेदार सीनचे खुलले रहस्य

दीपिका पादुकोण-रणवीर सिंहच्या घराचा VIDEO व्हायरल, किंमत ऐकून व्हाल हैराण

PREV
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.

Recommended Stories

Daler Mehndi | मंत्र्यांकडून गायक दलेर मेहंदी यांचा अपमान, मिका सिंग म्हणतो Mika singh
Saif Ali Khan : सैफ अली खानचा रॉकस्टार अवतार, बाल्कनीत वाजवली इलेक्ट्रिक गिटार