दीपिका पादुकोण-रणवीर सिंहच्या घराचा VIDEO व्हायरल, किंमत ऐकून व्हाल हैराण

Published : Aug 29, 2024, 12:01 PM IST
ranveer deepika

सार

अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहच्या घरी लवकरच चिमुकल्या बाळाचे आगमन होणार आहे. अशातच कपलच्या मुंबईतील वांद्रे येथील घराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Deepika Padukone-Ranveer Singh New House : बॉलिवूडमधील नेहमीच चर्चेत राहणारे कपल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहच्या घरी लवकरच बाळाचे आगमन होणार आहे. अशातच कपल बाळाचे स्वागत आपल्या नव्या घरात करणार असल्याचे बोलले जात आहे. मुंबईतील आलिशान आणि महागड्या अशा वांद्रे येथे रणवीर आणि दीपिकाने घर घेतले आहे. या नव्या घराचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. सोशल मीडियावर दीपिका-रणवीरच्या घराचा एक व्हिडीओ देखील तुफान व्हायरल होत आहे.

दीपिका-रणवीरच्या नव्या घराची खासियत
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहच्या नव्या घरातून समुद्राचा व्हू दिसतो. वांद्रे येथील बँडस्टँड येथे कपलने आलिशान घर खरेदी केले आहे. याशिवाय शाहरुख खानच्या घरापासून दीपिका आणि रणवीरचे घर अगदी जवळ आहे. घर 11,266 स्क्वेअर फूटवर विस्तारले असून एक सुंदर असे टेरेसही आहे. काहींना असे वाटतेय की, संपूर्ण इमारत दीपिका आणि रवणीरची आहे. पण असे नाही आहे.

कपलचा इमारतीमध्ये 16 व्या, 17 व्या, 18 व्या आणि 19 व्या मजल्यावर फ्लॅट आहे. कपलची 19 पार्किंग स्पेस, खासगी जिम, स्विमिंग पूल, मनोरंजाची जागा देखील आहे. सर्व गोष्टी प्रोफेशनल रुपात तयार करण्यात येत आहेत. दीपिका आणि रणवीरच्या वांद्रे येथील घराची किंमत 100 कोटींहून अधिक असल्याचे बोलले जात आहे. दोन वर्षांपूर्वी कपलने या अपार्टमेंटमध्ये घर बुकिंग केले होते. तेव्हापासून घराचे काम सुरू आहे.

वर्ष 2018 मध्ये दीपिका-रणवीरचे लग्न
दीपिका पादुकोण आणि रणवीरची पहिली भेट संजय लीला भंन्साळींचा वर्ष 2013 मध्ये आलेल्या राम-लीलाच्या सेटवर झाली होती. तेव्हापासून दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती. यानंतर वर्ष 2018 मध्ये कपलने अत्यंत जवळच्या मित्रपरिवाराच्या उपस्थितीत इटली येथे लग्न केले. कपलने पाच वर्षानंतर वर्ष 2023 मध्ये करण जौहरच्या एका शो मध्ये आपल्या लग्नाचा व्हिडीओ शेअर केला होता.

आणखी वाचा : 

गणेशोत्सवावेळी इको फ्रेंडली गणपतीची स्थापना करा, सलमान खानचे नागरिकांना आवाहन

कंगना राणौतकडून बॉलिवूडमधील काळ्या बाजूची पोलखोल, म्हणते इंडस्ट्रीत टॅलेंटला...

 

PREV
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.

Recommended Stories

Shah Rukh Khan: स्लोव्हाकियाच्या राजदूतांनाही भुरळ, DDLJ चा डायलॉग व्हायरल
Ranabaali Box Office: विजय देवरकोंडा आणि रश्मिकाच्या 'रणबाली'ची १०० कोटींकडे वाटचाल