
छोट्या पडद्यावरील मालिकांचा प्रेक्षकवर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे. त्यामुळं या मालिका पाहणारा प्रेक्षकवर्ग मोठ्या प्रमाणावर मालिका आवडीने पाहत असतो. महाराष्ट्रात चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम पाहणारा एक प्रेक्षक वर्ग तयार झाला होता. स्टार प्रवाहने एका नव्या मालिकेची सुरुवात केली असून तीच नाव ढिंच्याक दिवाळी असं ठेवण्यात आलं आहे.
दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे या शोच्या माद्यमातून निलेश साबळे आणि भाऊ कदम असे दोघेही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आता दोघांची जोडी जमणार असून ते दोघेही लवकरच टीव्हीवरच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं दिसून येत आहे.
स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर प्रोमो शेअर करून कार्यक्रमाची उत्सुकता वाढवायला सुरुवात केली आहे. चला हवा येऊ द्या मधून निलेश साबळे आणि भाऊ कदम दोघे बाहेर पडल्यामुळे प्रेक्षक प्रचंड नाराज झाले होते. पण आता दोघेही परत एकदा नवीन शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून रसिकांना हसवायला सज्ज झाली आहे.
सोशल मीडियावर स्टार प्रवाहने प्रोमो शेअर केल्यानंतर प्रोमोच्या कॅप्शनमध्ये ऐतिहाsहाsहाsसिक... ढिंचॅक दिवाळी...मिळणार बोनस मनोरंजनाचा... ‘ढिंचॅक दिवाळी’ असं म्हटलं आहे. या कॅप्शनवरून या कार्यक्रमात रंगतदार जुगलबंदी पाहायला मिळणार असल्याचं सुरुवातीला तरी दिसून येत आहे. दोघांचा लूक पाहून नक्की आता काय होणार हे लवकरच मालिकेतून दिसून येईल.