Netflix Acquires Warner Bros in Massive Deal : OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स, हॉलीवूडचा प्रसिद्ध स्टुडिओ वॉर्नर ब्रदर्सला विकत घेणार आहे. यासाठी नेटफ्लिक्स कंपनीने 7.45 लाख कोटी रुपये खर्च केले आहेत.
हॉलीवूडचा प्रसिद्ध स्टुडिओ वॉर्नर ब्रदर्स (वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी) आता OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स विकत घेणार आहे. या करारानुसार, वॉर्नर ब्रदर्सचे चित्रपट, टेलिव्हिजन स्टुडिओ आणि HBO, HBO Max सारखे चॅनल्स नेटफ्लिक्सचा भाग बनतील. हा व्यवहार रोख आणि शेअर्सच्या स्वरूपात होईल. याचे मूल्य 82.7 अब्ज डॉलर्स (सुमारे 7.45 लाख कोटी रुपये) आहे. पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत हे अधिग्रहण पूर्ण झाल्यावर, वॉर्नर ब्रदर्सचे जगप्रसिद्ध चित्रपट आणि सिरीज सर्व नेटफ्लिक्सवर उपलब्ध होतील.
24
नेटफ्लिक्सवर वॉर्नर ब्रदर्सचे चित्रपट
यामुळे वॉर्नर ब्रदर्सच्या 'द बिग बँग थिअरी', 'द सोप्रानोस', 'गेम ऑफ थ्रोन्स' आणि 'द विझार्ड ऑफ ओझ' सारखे चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहण्याची संधी मिळेल. हे अधिग्रहण कंपनीच्या सर्जनशील उद्दिष्टांना अधिक मजबूत करेल, असे नेटफ्लिक्सचे सह-सीईओ टेड सारंडोस यांनी म्हटले आहे.
34
नेटफ्लिक्सची वाढती लोकप्रियता
“जगाचे मनोरंजन करणे हे आमचे ध्येय आहे. 'कॅसाब्लांका', 'सिटिझन केन' सारख्या क्लासिक चित्रपटांपासून ते 'हॅरी पॉटर', 'फ्रेंड्स' सारख्या आधुनिक काळातील लोकप्रिय कलाकृतींपर्यंत, वॉर्नर ब्रदर्सचा भव्य संग्रह आमच्या 'स्ट्रेंजर थिंग्ज', 'डेमन हंटर्स', 'स्क्विड गेम' सारख्या निर्मितीमध्ये सामील झाल्यावर आम्ही आणखी चांगली कामगिरी करू शकू. प्रेक्षकांना जे आवडते ते अधिक प्रमाणात देण्यासाठी आणि पुढील शतकातील कथाकथनाला आकार देण्यासाठी हे विलीनीकरण मदत करेल,” असे टेड सारंडोस यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
नवीन करारानुसार, वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीच्या भागधारकांना प्रति शेअर 27.75 डॉलर्स मिळतील. हा करार अंमलात आल्यावर, जागतिक मनोरंजन क्षेत्रात नेटफ्लिक्सचे वर्चस्व आणखी वाढेल. कंपनीच्या विकासाचा पुढील टप्पा म्हणून, नेटफ्लिक्स न्यू जर्सीमध्ये 350 दशलक्ष डॉलर्स खर्चून एक नवीन स्टुडिओ कॉम्प्लेक्स देखील तयार करत आहे. त्याचे बांधकाम सध्या सुरू आहे.