अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जीवनगौरव पुरस्काराने नीना कुलकर्णी सन्मानित होणार

Published : Jun 06, 2025, 06:38 PM IST
neena kulkarni

सार

ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा 'जीवनगौरव पुरस्कार २०२४' जाहीर झाला आहे. रंगभूमी, सिनेमा आणि टेलिव्हिजनमधील त्यांच्या चार दशकांहून अधिक काळाच्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

मुंबई | प्रतिनिधी मराठी रंगभूमीवरील सशक्त अभिनय, नाजूक अभिव्यक्ती आणि चार दशकांहून अधिक काळ केलेल्या प्रगल्भ योगदानाची दखल घेत, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी यांना "जीवनगौरव पुरस्कार 2024" जाहीर केला आहे.

हा पुरस्कार १४ जून २०२५ रोजी मुंबई येथे होणाऱ्या नाट्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी त्यांना प्रदान केला जाईल. .हा सोहळा महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्रीआशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली तसंच उद्योगमंत्री , अ.भा.मराठी नाटय परिषदेचे विश्वस्त उदय सामंत यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

अभिनयातली परिपक्वता, व्यक्तिमत्त्वाची सौंदर्यता

नीना कुळकर्णी या केवळ अभिनेत्री नाहीत, तर त्या नाट्य, सिनेमा आणि टेलिव्हिजन या तिन्ही माध्यमांमध्ये सशक्त उपस्थिती जपणाऱ्या कलावंत आहेत. त्यांच्या अभिनयाचा प्रवास 'महाश्वेता', 'सावित्री', 'कस्तुरी' ते 'फायरब्रँड' व 'फोटोग्राफ'सारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपटांपर्यंत पोहोचलेला आहे. नीना कुळकर्णी यांचा गौरव केवळ एका व्यक्तीचा सन्मान नाही, तर तो एका संस्कृतीचा, एका शिस्तबद्ध अभिनयपद्धतीचा, आणि स्त्री पात्रांना दिलेल्या सन्मानाचे प्रतिबिंब आहे.

आजच्या झगमगत्या आणि काहीसा बाह्यरंगी अभिनयाच्या काळात, नीना कुळकर्णीसारख्या कलाकारांचा सत्कार ही भावी पिढ्यांना अभिनयाच्या मुळाशी परत नेणारी कृती ठरते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या या निर्णयामुळे, पारंपरिक नाटकाच्या मूल्यांना बळ मिळेल, यात शंका नाही.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

700 कोटींची मालकीण अभिनेत्री, 10 वर्षांनी लहान मुलाशी केले लग्न, वाचा बेडरुम सिक्रेट?
10 भाषांमध्ये 90 चित्रपट, पण 50 वर्षांनीही सर्वांना आवडणारी अविवाहित अभिनेत्री कोण?