
एंटरटेनमेंट डेस्क : झी मराठीवरील नुकत्याच काही नवीन मालिका सुरु झाल्या आहेत. नवरी मिळे हिटलरला हि मालिका यापैकीच एक आहे. अगदी कमी काळातच आगळ्या वेगळ्या स्टोरीमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर वेगळीच छाप सोडाली आहे. ‘हिटलर’ स्वभावाचा अभिराम आणि सतत गोंधळ घालणारी गोंधळी लीला यांची ही कथा ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेतून पाहायला मिळत आहे.या दोघांच्या केमिस्ट्रीमुळे मालिका प्रेक्षकांना खेळवून ठेवते.
आता पर्यंतच्या कथेनुसार, लीला हिला अभिनेत्री बनायचे आहे. तर, तिची सावत्र आई कर्जाच्या बदल्यात सावकाराला लीलाशी लग्न लावून देण्याची कबूली देते. दुसरीकडे, लीलाची सावत्र बहिण रेवती हिचा लीलावर प्रचंड जीव आहे. आता रेवती विक्रांत नावाच्या एका मुलाच्या प्रेमात पडली आहे. विक्रांत आणि रेवतीच्या नात्यात काही कारणांमुळे दुरावा निर्माण झाला आहे.त्यामुळे दोघंही एकमेकांचा जीव देण्याचा प्रयत्न करणार आहेत. विक्रांतने रेवतीला व्हिडीओ कॉल करून स्वतःच्या हाताची नस कापून घेतो तर दुसरी कडे ते पाहून रेवतीही तिच्या हाताची नस कापून घेते.
अभिराम करणार लीलाची मदत:
काही कामानिमित्त हॉस्पिटलमध्ये आलेला अभिराम आता डॉक्टरांची चांगली शाळा घेणार आहे. ‘डॉक्टर आहात तुम्ही... डॉक्टरकी स्वीकारताना एक शपथ घेतली होती की, तुम्ही प्रत्येक रुग्णाचा जीव वाचवाल. रुग्णासाठी तुम्ही देव आहात, त्यामुळे तुम्ही तुमचं काम सुरू करा. रेवतीचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करा. आपल्या प्रोफेशनला जागा’, असं म्हणत अभिराम डॉक्टरलाच सुनावणार आहे. एकाअर्थी अभिराम लीलाची मदत करणार आहे. एरव्ही लीलासोबत छत्तीस आकडा असणारा अभिराम यावेळी मात्र लीलाच्या मदतीसाठी धावून जाणार आहे. अभिरामच्या बोलण्यामुळे आता डॉक्टर रेवतीवर उपचार करण्यास सुरुवात करणार आहेत. ही गोष्ट कळल्यावर लीलाच्या मनात अभिरामविषयी असलेला गैरसमज दूर होईल का?, हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.
आणखी वाचा :
प्रिया बापट आणि उमेश कामतचा 'गुलाबी साडी आणि....' गाण्यावरील भन्नाट डान्स व्हायरल (Watch Video)
महेश मांजरेकरांनी केली नव्या चित्रपटाची घोषणा; आजच्या ज्वलंत परिस्थितीवर येणार नवा चित्रपट
संघर्षायोद्धा येतोय याचं महिन्यात तुमच्या भेटीला ; मराठानेता मनोज जरांगे यांच्या जीवनावर चित्रपट