Navri Mile Hitlerla Preview : अभिराम देणार अंतराची अंगठी लीलाच्या हातात, शेवटी लीला आणि अभिरामचं लग्न ठरलं ! वाचा आजच्या भागात काय होणार

Published : Apr 19, 2024, 06:59 PM IST
Navri Mile Hitlerla Previwe

सार

छोट्या पडद्यावरील ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेच्या आजच्या भागात अभिराम जहागीरदार त्याच्या पहिल्या पत्नीची म्हणजेच अंतराची अंगठी लीलाच्या हातात ठेवताना दिसणार आहे.तर ती अंगठी सांभाळण्याची जबाबदारी त्याने दिली आहे लिलावर टाकली आहे .

‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेच्या आजच्या भागात अभिराम जहागीरदार त्याच्या पहिल्या पत्नीची म्हणजेच अंतराची अंगठी लीलाच्या हातात ठेवताना दिसणार आहे.तत्पूर्वी कालच्या भागात लग्नाची तयारी सुरू होण्याआधी आजीने सगळ्यांना देवाचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात बोलावलं होतं. मंदिरातून बाहेर पडल्यावर आजीने अभिराम आणि लीला यांना एकत्र बाहेर जाण्यास सांगितलं होतं. तर, मी अभिरामच्या गाडीतून जाणार नाही, त्या उलट अभिरामने माझ्यासोबत माझ्या स्कूटरवरून यावं तरच मी त्यांच्यासोबत जाईन, अशी अट लीलाने घातली होती. तर, लीलाची ही अट अभिरामने देखील मान्य केली नाही.

आता लीलासोबत बाहेर जाण्यासाठी अभिराम तिच्या घरी पोहोचणार आहे. त्यावेळी तिथं विक्रांत लीलाला धमकी देण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, अभिराम वेळेत पोहोचल्याने विक्रांत पकडला गेला आणि त्याला पुन्हा एकदा अभिरामच्या रागाला सामोरे जावे लागले आहे. तर, अभिराम वेळेत तिथे पोहोचल्याने लीलाने देखील सुटकेचा निश्वास टाकला आहे. आता विक्रांत लीलाच्या घरून निघून गेला आहे. तर, आता लीला अभिरामला लग्न मोडण्याविषयी बोलणार आहे. मात्र, मी लग्न मोडायला नाही आलोय, हे लग्न ठरल्याप्रमाणेच होणार, असं म्हणत अभिराम लीलाच्या हातावर एक अंगठीची डबी ठेवणार आहे.

अंगठी दिल्यानंतर अभिरामला वैतागली लीला :

अभिराम लीलाच्या घरी येऊन अंतराची अंगठी देतो आणि त्या अंगठीची जबाबदारी दिली आहे. अभीरामसाठी हि अंगठी खूप खास आहे. कारण ही अंगठी त्याच्या पहिल्या बायकोची म्हणजेच अंतराची अंगठी आहे. लीलाकडे अंगठी सोपवताना अभिराम तिला म्हणतो की, मी साखरपुड्याच्या दिवशी हीच अंगठी तुझ्या बोटात घालणार आहे. तोपर्यंत ही अंगठी सांभाळून ठेवणं तुझं काम आहे. ही अंगठी लीलाने स्वतःकडे ठेवून तर घेतली. मात्र, आता अभिराम दर पंधरा-वीस मिनिटांनी लीलाला व्हिडीओ कॉल करून ही अंगठी तिच्याजवळ आहे की, नाही हे तपासून बघत आहे.त्यामुळे लीला कंटाळून अभिरामला म्हणते, अंकल आता हि अंगठी तुम्ही घेऊन जा मला वैताग आलाय.

PREV

Recommended Stories

Dhurandhar X Review : अ‍ॅक्शन पॅक्ड, मास एंटरटेनर.. 'धुरंधर' पाहून प्रेक्षक काय म्हणाले?
सुंदर कविता आणि रचना अपूर्ण राहिल्या, हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल केला पश्चाताप