आज आमिर खानचं झालं तिसरं लग्न, कोण आहे त्याची बायको?

Published : Jul 05, 2026, 10:22 PM IST
Aamir Khan and Gauri Spratt are now married

सार

अभिनेता आमिर खानने गौरी स्प्रॅटसोबत तिसरे लग्न केले आहे. मुंबईतील त्याच्या पाली येथील निवासस्थानी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला, जिथे दोघांनी विवाहपत्रांवर सह्या केल्या.

मुंबई - आमिर खान हा कायमच कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत येत असतो. आता तो त्याच्या लग्नाच्या निमित्तानं चर्चेत आला आहे. आमिर हा गौरीसोबत आज लग्न बंधनात अडकला आहे. आमिरच्या घरामध्ये हा लग्न विवाह पार पडला. यावेळी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. आपण याबद्दलची माहिती जाणून घेऊयात.

आमिर खानच्या आयुष्यात आली तिसरी पार्टनर 

आमिर खानच्या आयुष्यात आता तिसरी पार्टनर आली आहे. त्यानं आज गौरी स्प्रॅटसोबत विवाह केला. मुंबईच्या पाली इथल्या आमिर खानच्या निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला आहे. दोघांनी विवाहाच्या कागदपत्रांवर सह्या केल्या. या विवाहाच्या वेळी अगदी मोजकी मंडळी उपस्थित होती.

कोण मंडळी उपस्थित होती? 

यावेळी विवाह कार्यक्रमाला मुकेश अंबानी आणि त्यांच कुटुंब, दिग्दर्शक आणि आमीरचे मित्र आशुतोष गोवारीकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, आमीरची मुलगी इरा आणि मोठा मुलगा जुनेद खान, अभिनेता वीरदास आणि अभिनेत्री एली अब्राम लग्न कार्यक्रमाला उपस्थित होते. आमिर आणि गौरी या दोघांनी काही दिवसांपूर्वी त्यांचं नातं कबूल केलं होतं.

PREV
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

नाना पाटेकरांच्या दानशूरपणावर मधुर भांडारकर
Nana Patekar : नाना पाटेकर 'अभिनयाचं पुस्तक'; कॅमेऱ्यापुढचा जादूगार गमावला