मल्याळम अभिनेत्रीचा युवा नेत्यावर गंभीर आरोप, मेसेज वाचून बसेल प्रचंड धक्का

Published : Aug 21, 2025, 06:00 PM IST
Who Is Rini Ann George

सार

मल्याळम अभिनेत्री रिनी ॲन जॉर्ज हिने एका बड्या राजकीय पक्षाच्या युवा नेत्यावर तीन वर्षांपासून गैरवर्तन करत असल्याचा आरोप केला आहे. सोशल मीडियाद्वारे त्यांची ओळख झाली होती आणि त्यानंतर त्या नेत्याने आक्षेपार्ह मेसेज पाठवण्यास सुरुवात केली होती.

राजकीय नेत्यांनी अभिनेत्रींवर अत्याचार केल्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या आहेत. आता आणखी एका अभिनेत्री एका बड्या नेत्यावर आरोप केले आहेत. मल्याळम अभिनेत्री रिनी ॲन जॉर्ज हिनं कोचीमध्ये पत्रकार परिषद घेत एका मोठ्या राजकीय पक्षाच्या युवा नेत्यावर गंभीर आरोप केलेत. हा युवा नेता तीन वर्षांपासून गैरवर्तन करत असल्याचं त्या अभिनेत्रीने म्हटलं आहे.

पत्रकार परिषदेत काय दावा केला? 

तक्रार करूनही वरिष्ठ सदस्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोपही तिनं पत्रकार परिषद केला. रिनी एन जॉर्ज हिन बुधवारी कोचीमध्ये माध्यमांशी बोलताना सांगितलं की, सोशल मीडियाद्वारे तिची त्या राजकारण्याशी ओळख झाली होती. तीन वर्षांपूर्वी या अभिनेत्रीला आक्षेपार्ह मेसेज पाठवायला सुरुवात केली होती. त्यावर इतर महिलांनी त्रास दिल्याची तक्रार दाखल केली होती.

पोलिसात तक्रार दिल्यास जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. कोचीमध्ये बोलताना तिने म्हटलं आहे की, पोलिसात तक्रार केल्यास जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती वाटत होती, त्या मुळं तिनं तक्रार दाखल केले नाही, मात्र आता इतर महिलांसोबत असं काही घडू नये म्हणून यासाठी आता आवाज उठवत असल्याचं तीन म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे? 

सोशल मीडियाच्या माध्यमातून माझा त्या राजकारण्याशी संपर्क आला. तीन वर्षांपूर्वी त्याने मला आक्षेपार्ह मेसेज पाठवण्यास सुरुवात केली. जेव्हा मी त्याला हे सगळं उघडकीस करण्याची धमकी दिली, तेव्हा तो म्हणाला, 'जा कोणाला सांगायचं आहे त्याला सांग...कोणाला काहीही देणं घेणं नाहीये. इतर अनेक महिलांना असा त्रास सहन करावा लागला आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

'धुरंधर'चा धांसू रेकॉर्ड, 'पुष्पा 2', 'छावा'ला मागे टाकत ठरला नं. 1 चित्रपट
6 वर्षे लिव्ह-इनमध्ये राहिला, 2 मुलांचा बाप झाला, अखेर धुरंधरमधील या सुप्रसिद्ध अभिनेत्याने केला साखरपुडा!