महेश मांजरेकरांनी केली नव्या चित्रपटाची घोषणा; आजच्या ज्वलंत परिस्थितीवर येणार नवा चित्रपट

Published : Mar 28, 2024, 03:49 PM ISTUpdated : Mar 28, 2024, 03:51 PM IST
Mahesh Manjarekar

सार

महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती अत्यंत वाईट आहे.तसेच निवडणुकीची रणधुमाळी देखील सुरु झाली असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेणारा राजकीय चित्रपट महेश मांजरेकर काढणारा असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

एंटरटेनमेंट डेस्क : प्रसिद्ध मराठी आणि हिंदी चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी आज नवा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येणार असल्याची घोषणा केली आहे. दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जाते. यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दादरच्या शिवाजी महाराज पार्कवर वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं असून यावेळी मांजरेकर यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी या चित्रपटाबद्दल सांगितले.

मांजरेकर म्हणाले की, मी राजकारणासाठी नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त इथे आलो. तसेच मी माझ्या मित्रासाठी इथे आलो आहे. मांजरेकर यांना यावेळी विचारण्यात आलं की, तुम्ही अनेक वास्तवदर्शी चित्रपट काढले आहेत, त्यामुळे सध्याच्या राजकीय परिस्थितीवर तुमचं काय मत आहे. यावर महेश मांजरेकर म्हणाले, सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आपण नक्कीच एखादा चित्रपट काढूया.

महेश मांजरेकरांनी लढली निवडणूक :

महेश मांजरेकर यांनी यापूर्वी लोकसभा निवडणूक लढवली आहे. परंतु, त्या निवडणुकीत मांजरेकर यांचा पराभव झाला होता. मांजरेकर हे मनसेच्या राजकीय आणि सामाजिक व्यासपीठांवर अनेकदा उपस्थित असतात. तसेच ते बऱ्याचदा राजकीय परिस्थितीवर भाष्य करतात. शिवजयंतीच्या कार्यक्रमानंतर महेश मांजरेकर म्हणाले, शिवसेना आणि मनसे हे दोन्ही पक्ष आणि त्यांचे नेते सध्या एकाच व्यासपीठावर दिसतायत हे चांगलं चित्र आहे.

लवकरच येणार हे चित्रपट :

मांजरेकर यांचा ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा महत्त्वकांक्षी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. तसेच त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘जुनं फर्निचर’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘ही अनोखी गाठ’ हा चित्रपट अलीकडेच प्रदर्शित झाला. परंतु, या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली नाही.

महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती अत्यंत वाईट आहे.तसेच निवडणुकीची रणधुमाळी देखील सुरु झाली असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेणारा राजकीय चित्रपट महेश मांजरेकर काढणारा असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ते असं कुठे बोले आणि का बोले जाणून घ्या.

PREV

Recommended Stories

Dhurandhar X Review : अ‍ॅक्शन पॅक्ड, मास एंटरटेनर.. 'धुरंधर' पाहून प्रेक्षक काय म्हणाले?
सुंदर कविता आणि रचना अपूर्ण राहिल्या, हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल केला पश्चाताप