आलिया पुन्हा गरोदर... कान्समधील तिच्या लुकने दुसर्‍या प्रेगनन्सीच्या चर्चांना उधाण

Published : May 25, 2025, 05:19 PM IST
आलिया पुन्हा गरोदर... कान्समधील तिच्या लुकने दुसर्‍या प्रेगनन्सीच्या चर्चांना उधाण

सार

आलिया भट्ट पुन्हा गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. कान्स चित्रपट महोत्सवात तिचा पेहराव आणि लूक हे या चर्चेचं कारण आहे. नेमकं काय प्रकरण आहे, जाणून घ्या

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट लग्नाआधीच गरोदर होती हे सर्वांनाच माहित आहे. लग्नानंतर सहा महिन्यांनी आलिया आणि रणबीर कपूर यांना राहा ही मुलगी झाली. आता मात्र, हे जोडपे दुसऱ्या बाळाची प्लॅनिंग करत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या आहेत. 

याचं कारण म्हणजे कान्स चित्रपट महोत्सव. आलियाने नुकताच कान्स चित्रपट महोत्सव २०२५ मध्ये पदार्पण केलं. यावेळी तिचा स्टायलिश अंदाज सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आधी तिने शिआपरेली गाऊन घातला होता, त्यानंतर लॉरियल पॅरिसच्या 'लाईट्स ऑन वुमन्स वर्थ' या कार्यक्रमासाठी तिने अर्मानी प्राइव्हचा ड्रेस परिधान केला होता. मात्र, या ग्लॅमरस लूक्समध्येच सोशल मीडियावर आणखी एक चर्चा सुरू झाली. ती म्हणजे आलिया पुन्हा गरोदर असल्याची.

आलियाचा बेबी बंप आणि तिच्या चेहऱ्यावरील चमक पाहून रेडिटपासून ते इंस्टाग्रामपर्यंत अनेकांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे. नुकतीच आलिया भट्ट जे शेट्टी यांच्या पॉडकास्टमध्ये दिसली होती. तेव्हा तिने राहा या नावामागची कहाणी सांगितली होती. तिने मुलाचं नावही ठरवलं असल्याचं आणि दुसरं बाळ जर मुलगा झाला तर तेच नाव ठेवणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळेच अनेकांनी लवकरच दुसऱ्या बाळाची प्लॅनिंग करत असल्याचं म्हटलं होतं. 

पहिल्यांदा गरोदर असताना मुलाचं नाव शोधत असताना एक नाव खूप आवडलं होतं. ते नाव खूपच छान होतं. पण ते नाव काय ते सांगणार नाही असं ती म्हणाली होती. मुलगी झाल्यामुळे दुसरं नाव ठेवलं असल्याचं तिने सांगितलं. राहाचे नाव ठेवतानाही दोन्ही कुटुंबात खूप चर्चा झाली होती असंही तिने सांगितलं होतं. आता हे खरं असल्याचं बोललं जात आहे.

एवढंच नाही तर आलिया आणि रणबीर दोघांनीही दुसऱ्या बाळाची इच्छा याआधीच व्यक्त केली होती. २०२४ मध्ये आयएमडीबीच्या 'आयकॉन्स ओन्ली' या विभागात बोलताना आलिया म्हणाली होती की, 'अभिनेत्री म्हणूनच नाही तर निर्माती म्हणूनही अजून बरेच चित्रपट येतील अशी आशा आहे. तसेच मुलांबद्दलही विचार करत आहे.' दरम्यान, माशेबलसोबतच्या चॅटमध्ये रणबीरने त्याच्याबद्दल गुगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या प्रश्नांची उत्तरं देताना लवकरच बाळ व्हावं अशी इच्छा असल्याचं म्हटलं होतं.

मात्र, आत्ता तरी हे सगळे फक्त तर्कवितर्क आहेत. आलियाकडून कोणतीही अधिकृत पुष्टी आलेली नाही. सध्या ती कान्स चित्रपट महोत्सवातील तिच्या पदार्पणाचा आनंद घेत आहे, तर रणबीर कपूर संजय लीला भन्साळी यांच्या 'लव्ह अँड वॉर' या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.

 

PREV
Read more Articles on

Recommended Stories

700 कोटींची मालकीण अभिनेत्री, 10 वर्षांनी लहान मुलाशी केले लग्न, वाचा बेडरुम सिक्रेट?
10 भाषांमध्ये 90 चित्रपट, पण 50 वर्षांनीही सर्वांना आवडणारी अविवाहित अभिनेत्री कोण?