बोमन इराणीची मजेशीर पोस्ट, अनुपम खेर झोपले त्याच्या मांडीवर!

Published : May 24, 2025, 03:29 PM IST
boman irani

सार

अनुपम खेर दिग्दर्शित 'तन्वी द ग्रेट' चित्रपटाने कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२५ मध्ये प्रेक्षकांची मने जिंकली. बोमन इराणीने अनुपम खेर त्याच्या मांडीवर झोपलेला एक मजेशीर फोटो शेअर करत, चित्रपटाच्या यशस्वीतेचा आनंद साजरा केला. 

मुंबई: अभिनेता आणि दिग्दर्शक अनुपम खेर यांचा 'तन्वी द ग्रेट' चित्रपट कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२५ मध्ये सादर झाला आणि प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर, बोमन इराणीने एक गोंडस आणि मजेशीर क्षण सोशल मीडियावर शेअर केला आहे. बोमन इराणीने कारमध्ये अनुपम खेर त्याच्या मांडीवर झोपलेला एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये खेर आरामात झोपलेले दिसत असून, बोमनचे 'का माझ्याच मांडीवर?' असा चेहरा पाहून अनेकांनी हसून हसून प्रतिसाद दिला.

या पोस्टला बोमनने मजेशीर दिले कॅप्शन

"काम पूर्ण झालं आहे. प्रतिसाद मस्त मिळाला. ते खूप दमले आहेत... पण माझ्याच मांडीवर का???" या फोटोवर दिग्दर्शिका फराह खाननेही प्रतिक्रिया देत लिहिलं, "माझी स्पर्धा वाढलीय!" सोबत हसणाऱ्या इमोजी. ‘तन्वी द ग्रेट’ या चित्रपटाला कान्समध्ये प्रचंड प्रेम मिळालं. अनुपम खेर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरून एक व्हिडीओ शेअर केला, ज्यामध्ये बोमन इराणी, पल्लवी जोशी आणि नवोदित अभिनेत्री शुभांगी दत्त यांचाही सहभाग होता.

 

 

व्हिडीओमध्ये खेर म्हणतात, “हॅलो कान्स! आमच्या चित्रपटाला दिलेल्या प्रेमासाठी आणि उबदार स्वागतासाठी खूप खूप धन्यवाद. हा अनुभव अविस्मरणीय होता.” ते पुढे म्हणाले, “हा चित्रपट प्रत्येकाच्या हृदयाला भिडला आणि यासाठी मनापासून आभार. मी पुन्हा येईन – कधी अभिनेता म्हणून, कधी दिग्दर्शक म्हणून. इथं येणं म्हणजे एक पर्वणीच होती.”

यानंतर त्यांनी बोमनला उद्देशून म्हणाले:

“बोमन इराणी, मी कान्सला धन्यवाद देणारा व्हिडीओ करतोय. तू काय म्हणशील?” त्यावर बोमन हसत म्हणाले, “मी वाटतो तू गुडबाय म्हणू नकोस. फक्त 'Au Revoir' म्हण – कारण आपण पुढच्या वर्षी परत येणार आहोत. बुकिंग झालंय, हॉटेलचंही झालंय... विमानचं अजून बाकी आहे!” अनुपम खेर दिग्दर्शित ‘तन्वी द ग्रेट’ मध्ये आयन ग्लेन, जॅकी श्रॉफ, अरविंद स्वामी, करण टाकर आणि नासर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट कान्सच्या 'मार्शे दू फिल्म' विभागातही सादर करण्यात आला असून, येत्या १८ जुलैला हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

Ranveer Singh चा Dhurandhar बघून पाकिस्तानी क्रेझी, व्हिडिओमध्ये पाहा कसं केलं कौतुक!
700 कोटींची मालकीण अभिनेत्री, 10 वर्षांनी लहान मुलाशी केले लग्न, वाचा बेडरुम सिक्रेट?