Kishori Shahane Accident : अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या कारला अपघात; सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत व्यक्त बेशिस्त चालकांविरोधात संताप व्यक्त

Published : Jan 13, 2026, 03:00 PM IST
Kishori Shahane Accident

सार

Kishori Shahane Accident : ठाणे–मुंबई मार्गावर शूटिंगसाठी जात असताना अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या कारला बेशिस्त वाहनचालकाने धडक दिली. या अपघातात कुणालाही इजा झाली नाही, मात्र गाडीचे मोठे नुकसान झाले. 

Kishori Shahane Accident : मराठी सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोकप्रिय आणि ज्येष्ठ अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या चारचाकी वाहनाला ठाणे–मुंबई मार्गावर अपघात झाला आहे. शूटिंगसाठी जात असताना एका बेशिस्त वाहनचालकाने त्यांच्या गाडीला बाजूने धडक दिल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर इजा झाली नाही, मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

नेमकं काय घडलं?

किशोरी शहाणे या शूटिंगच्या निमित्ताने प्रवास करत होत्या. ठाणे–मुंबई मार्गावर जात असताना एका वाहनाने त्यांच्या चारचाकीला बाजूने जोरदार धडक दिली. या धडकेत गाडीचा साईड मिरर तुटला असून दरवाज्यालाही मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे अपघातानंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळी न थांबता पसार झाला.

अपघातानंतर अभिनेत्रीचा संताप

या घटनेनंतर किशोरी शहाणे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत आपला संताप व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, “प्रत्येकालाच घाई असते, मलाही आहे. पण कुणाच्या वाहनाला धडक दिल्यानंतर थांबण्याची साधी संवेदनशीलताही लोक दाखवत नाहीत. अशा घटनांमुळे फक्त पैशांचेच नाही तर मानसिक त्रासाचंही मोठं नुकसान होतं.”

सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ

किशोरी शहाणे यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेक नेटकऱ्यांनी, चाहत्यांनी आणि सहकलाकारांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. तर काहींनी बेशिस्त वाहनचालकांवर संताप व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी केली आहे.

 

 

चाहत्यांकडून काळजी आणि प्रतिक्रिया

या अपघातानंतर अभिनेत्री सुरक्षित असल्याचे समजताच चाहत्यांनी सुटकेचा श्वास घेतला. मात्र शहरातील वाढती वाहतूक आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे अशा घटना वारंवार घडत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Bigg Boss Marathi 6 । राधा आणि दीपाली यांच्यात वाद सुरू झाला; मिशन रेशन टास्क मध्ये गोंधळ
बिग बॉस मराठीच्या पहिल्या दिवसाची लढाई: पहिल्याच दिवशी रुचिता–तन्वीमध्ये तुफान वाद | Bigg Boss