करिष्मा कपूरच्या मुलांनी त्यांचे दिवंगत वडील संजय कपूर यांच्या ३० हजार कोटींच्या संपत्तीत वाटा मागितला आहे. सावत्र आई प्रिया कपूर यांनी मृत्युपत्र बदलल्याचा आरोप त्यांनी केला असून, प्रत्येक मालमत्तेतील पाचव्या वाट्याचा हिस्सा मागितला आहे.
करिष्मा कपूरला आधी १९०० कोटी रुपये मिळाले, ३०,००० कोटींच्या संपत्तीत परत मागितला हिस्सा, आता न्यायालय काय निर्णय देणार?
संजय कपूर यांच्या मालमत्तेत त्यांच्या दोन्ही मुलांचा वाटा असावा, अशी मागणी करत करिष्मा कपूरच्या मुलांनी वकिलांकडून न्यायालयात दावा दाखल केला आहे.
25
संजय कपूर यांच्या ३० हजार कोटींच्या संपत्तीचा वाद वाढला
अभिनेत्री करिष्मा कपूरचे पती संजय कपूर यांच्या ३० हजार कोटींच्या संपत्तीचा वाद निर्माण झाला आहे. करिष्माच्या दोन मुलांनी त्यांचे दिवंगत वडील संजय कपूर यांच्या मालमत्तेत वाटा मिळावा यासाठी मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सावत्र आई प्रिया कपूर यांनी मृत्युपत्र बदलल्याचा आरोप त्यांनी यामध्ये केला आहे.
35
प्रत्येक मालमत्तेतील पाचव्या वाट्याचा मागितला हिस्सा
प्रत्येक मालमत्तेतील पाचव्या वाट्याचा हिस्सा करिष्माच्या मुलांगी मागितला आहे. संजय कपूर यांनी थोडीथोडकी नव्हे तर ३० हजार कोटींची संपत्ती मागे ठेवली आहे. आज बुधवारी या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
45
प्रिया सचदेव कपूर यांनी बनावट मृत्युपत्र बनवलं
प्रिया सचदेव कपूर यांनी बनावट मृत्युपत्र बनवल्याचा दावा केला आहे. करिष्मा कपूर यांनी घटस्फोटानंतर गेली १५ वर्ष कुठेच दिसल्या नसून त्यांनी आता संपत्तीसाठी वाद निर्माण केल्याचं म्हटलं आहे.
55
करिष्मा कपूरचा दावा न्यायालयात टिकणार नाही
अभिनेत्री करिष्मा कपूरचा दावा न्यायालयात टिकणार नसल्याचं प्रिया कपूर हिच्या वतीने ज्येष्ठ वकील राजीव नायर यांनी म्हटलं आहे. याचिकाकर्ते आधीच ट्रस्टचे लाभार्थी आहेत आणि खटला दाखल करण्याच्या काही दिवसांपूर्वीच त्यांना १,९०० कोटी रुपयांची संपत्ती मिळाली आहे.