धनश्री वर्माने तिचा माजी पती यजुवेंद्र चहलबद्दल केलेल्या विधानांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने चहलबद्दल आदर व्यक्त करत असतानाच, इतरांना खाली खेचून स्वतःची प्रतिमा स्वच्छ करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर टीका केली आहे.
धनश्री वर्माने अचानक यजुवेंद्र चहलबद्दल दाखवला आदर, तो माझा नवरा...
धनश्री वर्मा सध्या 'राईज अँड फॉल' या शोमध्ये स्पर्धक म्हणून आल्याचे दिसून आलं आहे. त्यात तिने एक्स नवरा युजवेंद्र चहलबाबत काही विधाने केले असून ते चर्चेत आले आहेत.
25
धनश्री वर्मा परत आली चर्चेत
धनश्री वर्मा परत चर्चेत आली आहे. तिने तिचा एक्स नवरा यजुवेंद्र चहलबद्दल काही विधान केले आहेत. 'मी मनात असतं तर मी चुकीचे बोलू शकले असते. पण इतरांना खाली खेचून तुम्ही काय दाखवू इच्छिता?' असं तिने यावेळी बोलताना म्हटलं आहे.
35
धनश्रीच्या मनात अजूनही सॉफ्ट कॉर्नर
धनश्रीच्या मनात यजुवेंद्र चहलबद्दल अजूनही सॉफ्ट कॉर्नर आहे. तिने यावेळी बोलताना म्हटलं आहे की, "जर तुम्ही लग्न करत असाल तर तुमच्या जोडीदाराचा आदर तुमच्या हातात असतो. जर माझी इच्छा असती तर मी चुकीचे बोलू शकले असते. पण काहीही झाले तरी तो माझा नवरा होता.
45
मी कायम त्याचा आदर करत राहील
लग्नाच्या वेळीही मी त्याचा आदर करत होते आणि आताही ते करणे महत्त्वाचे आहे कारण मी एकेकाळी त्याच्याशी लग्न केले होते.. आणि जर तुम्हाला स्वतःला चांगले दाखवायचे असेल तर ते तुमच्या कामातून दाखवा.."
55
इतरांना खाली खेचून मी इमेज का स्वच्छ करू?
धनश्री पुढे म्हणाली की,, ‘इतरांना खाली खेचून तुमची इमेज का स्वच्छ करावी लागते... तुम्ही माझ्याविरुद्ध कितीही नकारात्मक पीआर करू शकता. त्याचा तुम्हाला कोणत्याही प्रकारे फायदा होणार नाही.