टायगर श्रॉफचा बागी ४ चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होण्याची शक्यता आहे. चित्रपटाने आतापर्यंत ३८ कोटींची कमाई केली असली तरी, वीक डेजमध्ये कमाईत घट झाली आहे.
Box Office Collection: बागी ४ चित्रपटाने किती कमाई केली?
बागी ४ हा टायगर श्रॉफ आणि संजय दत्ताचा चित्रपट आला आहे. सोनम बजावा या हिरोईनने या चित्रपटात काम केलं असून या चित्रपटाने आतापर्यंत ३८ कोटींची कमाई केली आहे.
25
बागी ४ चित्रपट फ्लॉप होण्याची शक्यता व्यक्त
बागी ४ हा चित्रपट फ्लॉप होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मंगळवारी म्हणजेच काल या चित्रपटाने ४ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटानं ओपनिंग वीकेंडला चांगली कमाई केली, पण वीक डेजमध्ये चित्रपटाच्या कमाईत घट झाली आहे.
35
टायगरच करिअर आलं धोक्यात
टायगर श्रॉफचे करिअर धोक्यात आलं आहे. मागील वर्षी आलेला 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा मोठ्या बजेटचा सिनेमा होता. तो बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरलेला. त्यानंतर त्याचा 'गणपत' सुद्धा सुपरफ्लॉप ठरला. त्यामुळं या सिनेमाकडून त्याला मोठ्या अपेक्षा होत्या.
45
बागी ४ ने दाखवली नाही कमाल
बागी ४ चित्रपटाने चांगली कमाल दाखवली नाही. या चित्रपटाने पहिल्या दिवशी १२ कोटींची कमाई केली असून दुसऱ्या दिवशी ९.२५ कोटी आणि तिसऱ्या दिवशी १० कोटींचा गल्ला जमवला आहे.
55
चित्रपटाने कमावले फक्त ३८ कोटी
या चित्रपटाने ५ दिवसांमध्ये ३८ कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपट काढणं आता त्यामुळं अवघड झालं आहे. जर 'बागी ४' नं दुसऱ्या वीकेंडला गती पकडली नाही, तर या चित्रपटासाठी हिट होणं कठीण आहे.