
कोल्हापुरी चप्पल आणि प्राडा यांचा वाद खूप दिवसांपासून सुरु आहे. प्राडा या परदेशी ब्रॅंडने कोल्हापुरी सारखी चप्पल बनवली असून तिची किंमत लाखाचा घरात आहे. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर हिने आता कोल्हापुरी चप्पल परदेशात घालून मिरवली आहे. करिनाने सोशल मीडियावर कोल्हापुरी घातलेला फोटो शेअर केला असून त्याला हटके कॅप्शन दिलं आहे.
करीना कपूरच्या या कृतीमुळे तिच्याबद्दलचा रिस्पेक्ट नेटकऱ्यांच्या मनात मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. तिची हि पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेली दिसून आली आहे. लंडनमधे सुट्टी एन्जॉय करत असताना तिने हा फोटो शेअर केला. सर्वजण याबद्दल करीन कपूरचे कौतुक करत आहेत. तिने टाकल्या फोटोमुळे कोल्हापूरचा मान जगभरात उंचावली आहे.
करिनाने इंस्टाग्रामवर लिहिताना म्हटलं आहे की, "सॉरी नॉट प्राडा, माझी चप्पल रिअल कोल्हापूरची आहे." करिनाने व्यक्त करताना म्हटलं आहे की, इंटरनॅशनल ब्रँडवर टीका केली आहे. करीनाच्या या छोट्या कृतीमुळे कोल्हापुरी चप्पल आणि कष्टकरी हातांना पुन्हा एकदा प्रकाशझोतात आणले आहे. प्राडा आणि कोल्हापुरी चप्पल या दोघांचा वाद पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
नुकतंच इटालियन फॅशन हाऊसनं त्यांच्या मेन्स स्प्रिंग समर 2025 कलेक्शनमध्ये एक चप्पल सादर केली, ती अगदी कोल्हापुरी चप्पलसारखी दिसत होती. सोशल मीडियावर आंतरराष्ट्रीय ब्रँड कोल्हापुरी चप्पलला कोणतंही क्रेडिट न देता भारतीय कारागिरीचा वापर केला होता. नंतर प्राडा ब्रॅंडने कोल्हापुरी चप्पल पाहूनच ही डिझाईन बनवल्याचं सांगितलं आहे.