
मुंबई: प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा सध्या अडचणीत आला आहे. त्याच्या शोला नाही तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात खळबळ उडाली आहे. द ग्रेट इंडियन कपिल शर्माच्या शोसोबतच त्याने हॉटेलिंग व्यवसायातही पाऊस ठेवले होते. काही दिवसांपूर्वीच त्यानं कॅनडामध्ये त्यानं कॅफे सुरु केला होता. त्या ठिकाणी दोनवेळा गोळीबार करण्यात आला होता.
या घटनेनंतर पोलिसांनी कपिलबाबत मोठे पाऊल उचलले आहे. अलिकडेच लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून कपिलला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. हे सर्व लक्षात घेऊन पोलिसांनी कॉमेडियनची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कपिल शर्माला कोणत्या प्रकारची सुरक्षा दिली आहे याची माहिती अजून समजली नाही.
कपिल शर्माच्या कॅफेमध्ये दोनदा गोळीबार करण्यात आला होता. सर्वात आधी १० जुलै रोजी कपिल शर्माच्या कॅप्स या कॅफेवर गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात कॅफेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होत. बब्बर खालसा इंटरनॅशनल (बीकेआय) कार्यकर्ते हरजीत सिंग लाडी यांनी या हल्ल्याची जबाबदारी घेतली.
दुसऱ्यांदा परत एकदा गोळीबार झाला होता. 7 ऑगस्ट रोजी कपिल शर्माच्या कॅफेवरही गोळ्या झाडण्यात आल्या. गँगस्टर गोल्डी ढिल्लनने यावेळी या हल्ल्याची जबाबदारी घेतली.आता परत एकदा बिष्णोई टोळीने कपिल शर्माला धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. कपिल शर्माला एक ऑडिओ पाठवण्यात आला असून यामध्ये धमकी देण्यात आली आहे.
जो कोणी सलमान खानसोबत काम करेल त्याला मारले जाईल. या ऑडिओमध्ये पुढे म्हटले होते की आता कोणताही दिग्दर्शक, निर्माता किंवा अभिनेत्याला इशारा दिला जाणार नाही, तर त्याला थेट गोळी मारली जाईल, असं ऑडिओमध्ये सांगण्यात आलं आहे.